Homeताज्या बातम्यादेश

उत्तराखंडमधील अपघातात 7 जणांचा मृत्यू

डेहराडून ः उत्तराखंडच्या नैनीताल जिल्ह्यात प्रवाशांनी भरलेली जीप 500 मीटर खोल दरीत कोसळली. या दुर्घटनेत सात जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये लहान म

ओडिशात 8 भाविकांचा अपघातात मृत्यू
अकोल्यातील अपघातामध्ये चौघांचा मृत्यू
आयशर कंटेनरची एकमेकांना धडक; एकाचा मृत्यू

डेहराडून ः उत्तराखंडच्या नैनीताल जिल्ह्यात प्रवाशांनी भरलेली जीप 500 मीटर खोल दरीत कोसळली. या दुर्घटनेत सात जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये लहान मुलांसह महिलांचा समावेश आहे. चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. शुक्रवारी (17, नोव्हेंबर) सकाळी आठ वाजतच्या सुमारास नैनितालच्या ओखल कांडा गावाजवळ एक जीप 500 मीटर खोल दरीत कोसळली. या दुर्घटनेत सात जणांचा जागीच मृत्यू झाला असून अनेकजण जखमी झाले आहेत. जीपमध्ये क्षमतेपेक्षा जास्त लोक होते तसेच चालकाचे जीपवरील नियंत्रण सुटल्याने जीप खोल दरीत कोसळल्याचे सांगण्यात येत आहे

COMMENTS