नाशिक: शहरातील सिडको आणि गोविंदनगर भागात शुक्रवारी दोन बिबट्यांचा संचार आढळून आल्याने स्थानिकांमध्ये भीती पसरली. वन विभागाने तीन तासांच्या प्रयत्

नाशिक: शहरातील सिडको आणि गोविंदनगर भागात शुक्रवारी दोन बिबट्यांचा संचार आढळून आल्याने स्थानिकांमध्ये भीती पसरली. वन विभागाने तीन तासांच्या प्रयत्नानंतर सिडकोतील रायगड चौकात बिबट्याला जेरबंद केले. तर, गोविंद नगरमधील अशोका प्राईड इमारतीत एका सदनिकेत शिरलेल्या बिबट्याला जागरुक डॉक्टराने खोलीत बंद केल्यामुळे मोठा अनर्थ टळला. या खोलीतील बिबट्याला बेशुध्द करून ताब्यात घेण्याचे प्रयत्न करण्यात येत आहेत. सिडकोत बघ्यांची मोठी गर्दी झाल्यामुळे जेरबंद करण्याच्या कार्यात अडथळे आले. गर्दीला पांगवण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला.
COMMENTS