Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पुण्यात पार्किंगमधील दुचाकी जाळल्या

वारजे परिसरात गुंडाचा धुमाकूळ

पुणे ः शहरातील वाढती गुन्हेगारी दिवसेंदिवस चिंतेचा विषय ठरत आहे. शहरात वाहनांची तोडफोड, जाळपोळ करत दहशत माजवण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. सध्या

तुळशीच्या पानांचा रोगांवर उपाय
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात जिल्हाधिकारी दिपा मुधोळ-मुंडे यांच्या हस्ते ध्वजारोहण
गुहात आमदार अबू आझमींना गावकर्‍यांचा विरोध

पुणे ः शहरातील वाढती गुन्हेगारी दिवसेंदिवस चिंतेचा विषय ठरत आहे. शहरात वाहनांची तोडफोड, जाळपोळ करत दहशत माजवण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. सध्या सर्वत्र दिवाळीची धामधुम सुरू असतानाच पुण्यामध्ये पार्किंगमधील वाहनांची जाळपोळ केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.  
याबाबत सविस्तर माहिती अशी की, पुण्यामध्ये रस्त्यावर पार्किंगमधील दुचाकी अज्ञातांनी पेटविल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शहरातील वारजे भागातील रामनगर टाकी चौक परिसरात हा प्रकार घडला. समाजकंटकांकडून रस्त्याच्या बाजूला असलेल्या तीन दुचाकी पेटविण्यात आल्यात तर एका चारचाकी वाहनाची काच फोडून नुकसान करण्यात आले आहे. गुरूवारी (16, नोव्हेंबर) मध्यरात्री पावणे दोनच्या सुमारास ही घटना घडली. दुचाकीवरून आलेल्या 2 व्यक्तींनी हा प्रकार केला असावा अशी शक्यता नागरिकांकडून वर्तविली आहे. या घटनेवर योग्य कारवाई करावी अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात आली असून वारजे पोलीस या प्रकरणी तपास करत आहेत.

COMMENTS