बेंगळुरू प्रतिनिधी - टीम इंडियाने विश्वचषकमध्ये विजयी मालिका सुरू ठेवत सलग 9 वा विजय मिळवला आहे. भारताने नेदरलँडचा 160 धावांनी पराभव केला आहे
बेंगळुरू प्रतिनिधी – टीम इंडियाने विश्वचषकमध्ये विजयी मालिका सुरू ठेवत सलग 9 वा विजय मिळवला आहे. भारताने नेदरलँडचा 160 धावांनी पराभव केला आहे. डच संघासमोर 411 धावांचे लक्ष्य होते, परंतु संपूर्ण संघ 47.5 षटकात 250 धावांत गारद झाला. बेंगळुरूमध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यात विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनीही गोलंदाजी करताना विकेट घेतल्या. तत्पूर्वी टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. भारतीय संघाने 50 षटकांत 4 गडी गमावून 410 धावा केल्या होत्या. भारताकडून श्रेयस अय्यर आणि केएल राहुल यांनी शतके झळकावली. भारताच्या 410 धावांना प्रत्युत्तर देताना नेदरलँडचा संघ 47.5 षटकात 250 धावांवर ऑलआऊट झाला. नेदरलँडसाठी तेजा निदामनुरूने 39 चेंडूत सर्वाधिक 54 धावा केल्या. भारताकडून जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, कुलदीप यादव आणि रवींद्र जडेजाने 2-2 विकेट घेतल्या. याशिवाय विराट कोहली आणि रोहित शर्माने प्रत्येकी 1 विकेट घेतली.
एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर टीम इंडियाने 50 षटकात 4 विकेट गमावत 410 धावा केल्या. संघाकडून श्रेयस अय्यरने नाबाद 128 धावांची खेळी केली. याशिवाय केएल राहुलने 102 धावा केल्या. याशिवाय शुभमन गिल, विराट कोहली आणि कर्णधार रोहित यांनीही अर्धशतके झळकावली.
COMMENTS