Homeताज्या बातम्यादेश

उत्तराखंडमध्ये निर्माणाधीन बोगदा कोसळला

40 हून अधिक कामगार बोगद्यात अडकले

डेहराडून : उत्तराखंड राज्यात ऐन दिवाळीच्या दिवशीच निर्माणाधीन बोगदा कोसळण्याची मोठी दूर्घटना घडली आहे. रविवारी सकाळी चमोलीनंतर उत्तरकाशी जिल्ह्या

गरिबांसाठी काँग्रेसने काहीच केले नाही- पंतप्रधान
संसदेवरील चढाई आणि…. 
राज्यांच्या आवाजाचा एल्गार !

डेहराडून : उत्तराखंड राज्यात ऐन दिवाळीच्या दिवशीच निर्माणाधीन बोगदा कोसळण्याची मोठी दूर्घटना घडली आहे. रविवारी सकाळी चमोलीनंतर उत्तरकाशी जिल्ह्यातही बांधण्यात येणार्‍या बोगद्यात अपघात झाला आहे. यमुनोत्री राष्ट्रीय महामार्गावर बांधण्यात येणारा बोगदा कोसळल्याने यात 40 कामगार अडकले आहेत. या घटनेनंतर मदत आणि बचावकार्य सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार सिल्क्यरा ते दंडलगाव दरम्यान, नवयुग कंपनीतर्फे बोगदा बांधण्याचे काम सुरू आहे. हा बोगदा अचानक कोसळला. दरम्यान, बोगद्यात अडकलेल्या मजुरांना वाचवण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि एनडीआरएफ बचाव पथक रवाना करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री उशिरा बांधकाम सुरू असतांना हा बोगदा कोसळला. बांधकाम सुरू असलेल्या बोगद्याला तडे गेल्याने सुमारे 40 कामगार अडकले आहेत. सिल्क्यराकडे 200 मीटर पर्यंत बोगद्यात ढिगारा कोसळला आहे. त्यात काम करणारे सर्व मजूर 800 मीटर अंतरावर अडकले आहेत. बोगद्यात अडकलेल्या कामगारांना ऑक्सिजन पाईपद्वारे ऑक्सिजन दिला जात आहे. सध्या तरी कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. घटनेची माहिती मिळताच जिल्हा मुख्यालयातून मदत आणि बचाव पथके अपघातस्थळी रवाना करण्यात आली. मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. बांधकाम सुरू असलेल्या बोगद्यात अडकलेल्या सुमारे 40 मजुरांना बाहेर काढण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि एसडीआरएफची टीम युद्धपातळीवर काम करत आहे. बोगद्याच्या आत ऑक्सिजनसाठी पाईप टाकण्याचे काम सुरू आहे. रविवारी पहाटे चार वाजता ही दुर्घटना घडल्याची माहिती आहे. बचाव पथकाकडून मलबा हटवण्याचे काम सुरू आहे. उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यातही 2021 मध्ये बोगद्यात कामगार अडकले होते. तपोवन बोगद्यात कामगार अडकले होते. बोगद्यातील ढिगारा हटवण्यासाठी जेसीबीसह डंपर तैनात करण्यात आले होते, मात्र अनेक दिवसांच्या प्रयत्नांनंतरही जिल्हा प्रशासनाला यश आले नव्हते. बोगद्यात अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी नवीन मशीनने ड्रिल करण्याचा प्रयत्न करण्यात आला. जिल्हा प्रशासनाकडून अनेक दिवसांपासून मदत आणि बचावकार्य सुरू होते. बोगद्यात अडकल्याने 53 मजुरांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता.

बचाव कार्य सुरू ; कामगार सुरक्षित- जिल्हा प्रशासनाने ढिगार्‍याखाली अडकलेल्या मजुरांना बाहेर काढण्यासाठी बचाव मोहीम हाती घेतली आहे. अधिकार्‍यांनी सांगितले की, या मजुरांना बाहेर काढण्यासाठी दोन ते तीन दिवस लागू शकतात. उत्तर काशीचे पोलीस अधीक्षक अर्पण यदुवंशी यांनी या घटनेबाबत सांगितले की, बोगद्यात अडकलेले सर्व कामगार सुरक्षित आहेत. तसेच त्यांच्याकडे ऑक्सिजन सिलेंडरदेखील आहेत. त्याचबरोबर एक ऑक्सिजन पाईपही बोगद्यात पोहोचवली आहे. यासंदर्भात अर्पण यदुवंशी म्हणाले, जिल्हा प्रशासनाच्या नेतृत्वात पोलीस, एसडीआरएफ, एनडीआरएफ, अग्निशमन दल आणि इतर आपत्कालीन कर्मचारी युद्धपातळीवर काम करत आहेत. बोगद्याचा मलबा (डेब्रिज) हटवण्याचे काम सुरू आहे. तसेच उभ्या ड्रिलिंग मशीन्सची (खोदकाम करणारी यंत्रसामग्री) व्यवस्था करण्यात आली आहे.

COMMENTS