Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

दौंड-मनमाड मार्गावरील बेलवंडी विसापूर मार्ग पूर्ण

तब्बल 14.03 किमीचे दुहेरीकरण पूर्ण ; रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडून पाहणी

अहमदनगर ः दौंड-मनमाड मार्गातील 14.03 किमीच्या दुहेरीकरणाचा बेलवंडी-विसापूर मार्ग गुरूवारी 9 नोव्हेंबर रोजी यशस्वीरित्या पूर्ण झाला असून, या मार्ग

आयुष्याचा अंतिम हेतू समाधान हाच आहे – डॉ. संजय कळमकर
पारनेर सैनिक बँकेची सभा रद्द करण्याची संचालक मंडळावर नामुष्की
शेतकऱ्यांनी केली होती गांज्याची शेती… पोलिसांनी टाकली धाड…

अहमदनगर ः दौंड-मनमाड मार्गातील 14.03 किमीच्या दुहेरीकरणाचा बेलवंडी-विसापूर मार्ग गुरूवारी 9 नोव्हेंबर रोजी यशस्वीरित्या पूर्ण झाला असून, या मार्गाचे काल रेल्वे सुरक्षा आयुक्त मनोज अरोरा यांनी सुरक्षा तपासणीनंतर नव्याने उघडलेल्या दुहेरी मार्गाचे सुरक्षित प्रमाणपत्र दिले. निर्माण मुख्य प्रशासकीय अधिकारी  विवेक कुमार गुप्ता,  डीआरएम सोलापूर  नीरज कुमार दोहरे हेही पाहणीवेळी उपस्थित होते. यावेळी 123 किलोमीटर प्रतिसाद स्पीडची ट्रायल घेण्यात आली. मध्य रेल्वेने चालू आर्थिक वर्षात 23 एप्रिल ते आजपर्यंत 5 विभागांमध्ये 161.80 किमी मल्टीट्रॅकिंग (नवीन लाइन, दुहेरी, 3 री, 4 थी मार्गिका) पूर्ण केली आहे. या वर्षात नवीन रू. 3890 कोटी मार्गिका, दुप्पट, 3 री, 4 थी मार्गिका, गेज रूपांतरणासाठी नियोजिन केले आहे. आजपर्यंतचा रू. 2990 कोटी खर्च झाला आहे. दौंड-मनमाड सेक्शन दुहेरीकरण पूर्ण केल्याने ट्रेनची गतिशीलता वाढण्यास मदत होणार असून, रेल्वे क्रॉसिंग खोळंबण्याची वेळ आणि सेक्शनची गर्दी कमी होण्यास मदत होणार आहे.

दौंड-मनमाड दुहेरीकरणाचा तपशील
लांबी- 236.61 किमी
पूर्ण दुहेरीकरण- 134.31 किमी (56.76)
किंमत- 2081.27 कोटी
आजपर्यंतचा खर्च- रु. 1572.28 कोटी
एकूण भौतिक प्रगती- 67%

पूर्ण दुहेरी – 134.31 किमी
काष्टी-विसापूर
सारोळा-अकोळनेर
पढेगाव-पुणतांबा
कान्हेगाव-मनमाड

ब) पूर्णत्वाच्या जवळ विभाग-
(या आर्थिक वर्षात सुरू होण्याची शक्यता)
54.04 किमी- निंबलक-पढेगाव

प्रगतीपथावर- 54.04 किमी
दौंड-काष्टी
विसापूर-सारोळा
अकोळनेर-निंबळक
पुणतांबा-कान्हेगाव
भूसंपादन आवश्यक- 68.16 हेक्टर
भूसंपादन पूर्ण झाले – 13.14 हेक्टर (20%)
भूसंपादन राहिले – 55.02 हेक्टर (80%).

COMMENTS