Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शिक्षण, नोकर्‍यांसह राजकीय आरक्षण सुद्धा घेणार

मनोज जरांगेच्या निर्धारामुळे मराठा-ओबीसी संघर्ष पेटण्याची चिन्हे

छ.संभाजीनगर : राज्यात मराठा आरक्षण प्रश्‍नानंतर आता ओबीसी नेतेही आक्रमक झाले आहेत. मराठा समाजाला कुणबीतून दाखले देण्यास विरोध होत असून, याविरोधात

मनोज जरांगे यांचे उपोषण पुन्हा सुरू
मनोज जरांगे यांची संगमनेरमध्ये आज जाहीर सभा
मनोज जरांगे यांची प्रकृती बिघडली

छ.संभाजीनगर : राज्यात मराठा आरक्षण प्रश्‍नानंतर आता ओबीसी नेतेही आक्रमक झाले आहेत. मराठा समाजाला कुणबीतून दाखले देण्यास विरोध होत असून, याविरोधात ओबीसी नेत्यांनी आक्रमक पवित्रा घेतला.  मराठा समाजाला आरक्षण देतांना फक्त शिक्षण आणि नोकरीतच दिले गेले पाहिजे अशी भूमिका काही जणांनी घेतली आहे. मात्र, यावर मनोज जरांगे यांनी ओबीसी समाजाला आरक्षणामध्ये ज्या काही सुविधा आहेत, त्या सर्व सुविधा मराठा आरक्षण देतांना आम्हाला मिळाल्या पाहिजे. ओबीसींना शिक्षण आणि नोकर्‍यासह मिळणार राजकीय आरक्षण सुद्धा मराठा समाजाला मिळाले पाहिजे, आणि हे आम्ही मिळवणारच असा निर्धार देखील जरांगे पाटील यांनी केला असून यामुळे आता ओबीसी आणि मराठा असा संघर्ष पेटण्याची शक्यता आहे.

मनोज जरांगे यांनी छत्रपती संभाजीनगर मध्ये पत्रकार परिषद घेतल्यानंतर त्यांनी हे वक्तव्य केले आहे. मराठा आरक्षण घेताना त्यात राजकीय आरक्षण घ्यायचे की नाही असा प्रश्‍न पत्रकारांनी त्यांना विचारला असता, यावर उत्तर देतांना मनोज जरांगे म्हणाले, आमचे जे काही हक्काचे आहे ते आम्हाला मिळणारच आहे. आम्ही ते मिळवणारच आहोत. मात्र, त्यांनी त्यांची स्पष्ट भूमिका जाहीर करावी की, त्यांचा नेमका विरोध कशाला आहे. आम्ही पूर्वीपासूनच ओबीसी असल्याने ओबीसीचे सर्व हक्क आम्हाला मिळणारच आहे. आमचे हक्काचे आहे त्यामुळे तो आम्ही का सोडायचा? मराठा समाजाला ओबीसीमध्ये आरक्षण देण्यासाठी आमचा कोणत्या कारणासाठी विरोध आहे असे त्यांनी स्पष्ट करावं. आमचं जे काही आहे, त्या सर्व सुविधा आम्हाला मिळाल्या पाहिजे. जे काही ओबीसींना मिळते, ते सर्व काही आम्हाला मिळालं पाहिजे. ओबीसींना शिक्षण आणि नोकर्‍यासह मिळणार राजकीय आरक्षण सुद्धा मराठा समाजाला मिळालं पाहिजे. असं थेटच जरांगे यांनी म्हटले आहे. त्यामुळे यावरून आता ओबीसी समाज आणखीनच आक्रमक होण्याची शक्यता आहे.  मनोज जरांगे पाटील यांच्या या भूमिकेमुळे आता ओबीसी आणि मराठा संघर्ष पेटणार आहे. मराठ्यांच्या अरक्षणावरून छगन भुजबळ यांनी आक्षेप नोंदवला होता. त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांच्या या भूमिकेनंतर आता ते काय भूमिका घेतात या कडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

COMMENTS