Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पुण्यात आढळला पती-पत्नीचा मृतदेह

हात पाय होते बांधलेले, हत्या की आत्महत्या?

पुणे : पुण्यातील लोहगाव परिसरातील बंद फ्लॅटमध्ये एका तरुण जोडप्याचे मृतदेह आढळून आले आहेत. यामध्ये 23 वर्षांचा तरुण आणि त्याची 21 वर्षांची पत्नी

डॉ. आंबेडकरांच्या विचारांवर मार्गक्रमण करणे हीच खरी आदरांजली – आमदार आशुतोष काळे
माऊली विद्यालय जवळबन येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी
१२ नोव्हेंबर पासून अहिल्यानगर केंद्रावरील ६४ व्या हौशी मराठी राज्य नाटय स्पर्धेला सुरुवात

पुणे : पुण्यातील लोहगाव परिसरातील बंद फ्लॅटमध्ये एका तरुण जोडप्याचे मृतदेह आढळून आले आहेत. यामध्ये 23 वर्षांचा तरुण आणि त्याची 21 वर्षांची पत्नी असे दोघेजण लोहगाव येथील इमारतीत भाडे तत्त्वावर राहात असलेल्या त्यांच्या फ्लॅटमध्ये मृतावस्थेत आढळले आहेत. त्यांचे मृतदेह सडण्यास सुरुवात झाली होती. डबल बेडवर हात बांधलेल्या अवस्थेत दोघांचे मृतदेह आढळले आहेत. या प्रकरणी विमानतळ पोलिसांनी चौकशी सुरु केली आहे.
या दाम्पत्याचा मृतदेह सडण्यास सुरुवात झाल्याने या घटनेचा उलगडा झाला. पोलिस घटनास्थळी गेल्यावर दोघांचेही मृतदेह हे बेडवर बांधले असल्याचे दिसून आले. यामुळे त्यांच्या मृत्यू की खून याचे गूढ वाढले आहे. पोलिसांनी तपास सुरू केला असून अद्याप माहिती देण्यास नकार दिला आहे. या प्रकररणी विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किरण महादेव बोबडे (वय 23) आणि आरती बोबडे (वय 21) असे मृतदेह सापडलेल्या दोघांची नावे आहे. किरण हा पोस्टात कंत्राटी तत्त्वावर काम करत होता. तर आरती एका खासगी बँकेत काम करत होती. विमानतळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार लोहगाव येथील एका सोसायटीतून एका फ्लॅटमधून दुर्गंधी येत असल्याची माहिती सोमवारी पोलिस कंट्रोलरूमला मिळाली. त्यांनी ही माहिती विमानतळ पोलिसांना दिली. पोलिस सकाळी 11 च्या सुमारास घटनास्थळी पोहचले. त्यांनी दरवाजा वाजवला असता यातून कुणी प्रतिसाद दिला नाही. दोन तीन दिवसांपासून दरवाजा उघडला नसल्याचे सोसायटीत राहणार्‍या काही नागरिकांनी सांगितले. दरम्यान, फ्लॅट मधून मोठ्या प्रमाणात दुर्गंधी येत होती. पोलिसांनी फ्लॅटचा दरवाजा तोडला. पोलिस आत गेले तेव्हा तेथील दृश भयावह होते. दोघांचेही मृतदेह बेडवर पडून होते. तसेच त्यांचे हात पाय बांधले होते, असे विमानतळ पोलिसांनी सांगितले.

COMMENTS