मुंबई : मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने गोरेगाव परिसरात चालत असलेल्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला. हे सेक्स रॅकेट एका घरातून चालवण्यात येत होते.
मुंबई : मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने गोरेगाव परिसरात चालत असलेल्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला. हे सेक्स रॅकेट एका घरातून चालवण्यात येत होते. एका 64 वर्षीय महिलेच्या घरातून सेक्स रॅकेट सुरू असल्याचे माहिती मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट 10 ने या कारवाईत एका अल्पवयीन मुलीची सुटका केली आहे.
मुंबईमध्ये सुरू असलेल्या सेक्स रॅकेटविरोधात मुंबई पोलिसांची कारवाई सुरू असते. मुंबई पोलीस गु्न्हे शाखा युनिट 10 ला गोरेगाव पश्चिम येथे एका घरातून सेक्स रॅकेट सुरू असल्याची माहिती समजली. त्यानंतर पोलिसांनी कारवाई केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोरेगाव पश्चिम येथील सिद्धार्थ नगर येथील इमारत क्रमांक 16 मधील रुम क्रमांक 242 मधून रॅकेट सुरू असल्याचे आढळून आले. या प्रकरणी अरूणा संतोष सिंग (64 वर्ष), रेश्मा फरीद शेख (30 वर्ष) आणि रिझवान नसीर सय्यद (31 वर्ष) हे तिघे हे सेक्स रॅकेट चालवत असल्याचे तपासात आढळून आले आहे. या कारवाईत एक 16 वर्षीय मुलगी आणि एका महिलेची सुटका करण्यात आली असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणी गोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवत मुलीची सुटका केली आहे. पोलिसांनी रिझवानला अटक केली केली असून पुढील तपास सुरू आहे. मुंबईत यापुर्वीदेखील पोलिसांनी सेक्स रॅकेट चालवणार्यांविरोधात कारवाई केली आहे. अनेक हायप्रोफाइल प्रकरणे उघडकीस आणली होती. मात्र, गोरेगाव मधील निवासी परिसरातील इमारतीमध्ये सेक्स रॅकेट चालवण्यात येत असल्याचे समोर आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. मुंबईत एप्रिल महिन्यात एका हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला होता. पोलिसांनी या प्रकरणी एका भोजपुरी अभिनेत्रीला अटक केली होती. मुंबई गुन्हे शाखेच्या समाजसेवा शाखेला गोरेगाव येथील रॉयल पाम हॉटेलमध्ये सेक्स रॅकेट चालवले जात असल्याची गुप्त माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी छापेमारी केली. यावेळी तीन मॉडेल्सची सुटका करण्यात आली असून त्यांना या काळ्या धंद्यात जबरदस्तीने ढकलण्यासाठी कारणीभूत असलेल्या एका दलाल महिलेला अटक केली आहे. अटक करण्यात आलेली ही महिला ही भोजपुरी अभिनेत्री आहे. या अभिनेत्रीने ’लैला मजनू’ या भोजपुरी फिल्ममध्ये तसेच ’जॉमेस्टिक बॉक्स’ या वेब सिरीज आणि ’बाप नंबरी बेटा दस नंबरी’ या भोजपुरी कॉमेडी एपिसोडमध्ये काम केलेले आहे. तसेच तिने भोजपुरी, हिंदी, पंजाबी या विविध भारतीय भाषांमधील अल्बम साँगमध्ये लीड रोल केला होता.
COMMENTS