Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मानोरीच्या चोरीत आरोपी निघाला नात्यातील

पोलिसांनी अखेर सुतावरून गाठला स्वर्ग

देवळाली प्रवरा ः राहुरी तालुक्यातील मानोरी गावात वृद्ध महिलेवर हल्ला चोरी करून जबरी केल्याप्रकरणात अखेर राहुरी पोलीसांनी सुतावरून स्वर्ग गाठला आह

आमदार थोरात यांच्या यशोधन कार्यालयाकडून निमज येथील लष्करे कुटुंबाला मदतीचा हात
सिद्धेश काळेची थाळी फेक क्रीडा स्पर्धेसाठी निवड
औषधांची मागणी वाढली; बदलत्या वातावरणाचा परिणाम

देवळाली प्रवरा ः राहुरी तालुक्यातील मानोरी गावात वृद्ध महिलेवर हल्ला चोरी करून जबरी केल्याप्रकरणात अखेर राहुरी पोलीसांनी सुतावरून स्वर्ग गाठला आहे. चोरीचा बनाव करून नातेवाईकांमधीलच एका तरूणाने हा प्रकार केल्याची धक्कादायक माहीती उघडकीस आली आहे. यातील प्रमुख आरोपी हा फिर्यादिचा नातेवाईक असून त्यास व त्याच्या साथीदाराला पोलिसांनी अटक केली आहे.आता पोलिस चौकशीमध्ये आणखी काही धक्कादायक माहीती समोर येणार असल्याचे पोलिस सुत्रांकडून समजले आहे.

          मानोरी येथील गणपवाडी परीसरात शनिवार 21 ऑक्टोबर रोजी लक्ष्मण रामचंद्र खामकर यांच्या बंगाल्यात हा सिनेस्टाईल थरार घडला होता. खामकर व त्यांची पत्नी अन मुलगी हे पारनेर येथे देवदर्शनासाठी गेले असता त्यांच्या घरी त्यांची वृद्ध आई सरुबई खामकर एकट्याच  असल्याचा गैरफायदा घेत गंभीर जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात पडल्यानंतर आरोपींनी गळ्यातील चार तोळ्याचे आलेल्या या मोटरसायकलवरून दोघांनी बंगल्याची बेल वाजवून सीसीटिव्ही कॅमेरा दुरूस्त करण्यास आलो आहे असे सांगुन घरात प्रवेश करून वृद्ध सरूबाई यांच्या तोंडात बोळा कोंबत डोक्याला गंभीर मारहाण केली होती. सदर मारहाणीत सरूबाई यांचे सोन्याचे दागिने घेवून पोबारा केला होता. भर दिवसा  सिनेस्टाईल प्रकार घडल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते.

                 घटनेचा तपास राहुरीचे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांनी तात्काळ सुरु करून काही तांत्रिक विश्‍लेषणाच्या व नागरिकांच्या दिलेल्या महितीवरुन कोल्हार येथील रोहित एकनाथ कानडे (वय-24 रा. कोल्हार) व गणेश सुनिल लोंढे (वय-22 वर्षे, रा. चिंचोली फाटा) या तरुणांनीच सदर जबरी चोरी केल्याचे निष्पन्न होताच पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांच्या पोलीस पथकातील पोलीस उपनिरीक्षक पोपट कटारे,पोलीस हवालदार सोमनाथ जायभाय, पोलीस नाईक संतोष राठोड, पोलीस कॉन्स्टेबल आदिनाथ पाखरे, प्रमोद ढाकणे, महेश शेळके वं सचिन ताजने यांनी आरोपीस अनुक्रमे चिंचोली फाटा व श्रीरामपूर येथून मोठ्या सीताफिने ताब्यात घेऊन अटक केली आहे. आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपींना पोलिस कोठडी सुनवली आहे.

आरोपी आजीच्या सुनेचा चुलत भाऊ !- वृद्ध महिलेवर प्राणघातक हल्ला करणारा आरोपी हा त्या वृद्ध महिलेच्या मोठ्या सुनेचा सख्खा चुलत भाऊ आहे. आरोपी हा नातेवाईकच असल्याने त्यास घरातील सर्व व्यक्तींची माहिती असून घरातील सीसीटीव्ही देखील बंद असल्याची पूर्णतः माहिती असल्याने सदर हा प्रकार घडला असावा असा देखील पोलिसांचा संशय आहे. त्यावर पोलिस आता अधिक तपास करत असून या घटनेतून अधिक धक्कादायक माहिती पोलीस तपासात समोर येणार असल्याचे समजते.

टॅटूमुळे पोलिस पोहचले आरोपीपर्यंत – वृद्ध महिलेवर प्राणघातक हल्ला झाल्यानंतर जखमी महिलेने हल्ला करणार्‍या एका तरुणाच्या डाव्या हातावर गोंदलेले (ट्याटू)चे तीन पट्टे आहे, असे पोलिस जबाबात सांगितले. त्यानुसार पोलिसांनी फिर्यादीच्या कोणत्या नातेवाईकांच्या हातावर गोंदलेल आहे का? याचा शोध घेतल्यानंतर एका नातेवाईकाच्या तरुणावरच्या हाताला गोंदलेले असल्याचे पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर सदर तरुणावर पोलिसांचा संशय बळावला तसेच मोबाईल लोकेशनमुळे कोल्हार येथील रोहित कानडे हाच मुख्य संशयित आरोपी असल्याचे निष्पन्न झाले.

शॉर्ट फिल्म अन् चोरीचा बनाव- आरोपी रोहित कानडे हा शॉर्ट फिल्म, युट्युब स्टोर्‍या बनवण्याचे काम करत होता. त्याचे फिर्यादीच्या कुटुंबाशी जवळचे संबंध होते. नात्यात आणि जवळच्या संबंधात ही आजी अडसर ठरत असल्याची दबक्या आवाजात चर्चा होती. त्यामुळे शॉर्ट फिल्म सारखी स्टोरी बनवून चोरीचा बनाव करूण आजीचा गेम करण्याचा प्लॅन कानडे याने केला तर नव्हता ना? मात्र सदर सर्व घटनेत ती आजी बालंबाल बचावली अन् रोहित कानडे याचा गेम फसला. पोलीस खाक्या दाखवताच पोपटावानी बोलू लागला आणि जेलची हवा खावी लागली.

COMMENTS