मुंबई : याअगोदर मुंबई विद्यापीठाच्या नोंदणीकृत पदवीधर गटाची अधिसभा निवडणूक रातोरात स्थगित केल्यामुळे विद्यार्थी संघटनामध्ये मोठा गदारोळ बघायला मि
मुंबई : याअगोदर मुंबई विद्यापीठाच्या नोंदणीकृत पदवीधर गटाची अधिसभा निवडणूक रातोरात स्थगित केल्यामुळे विद्यार्थी संघटनामध्ये मोठा गदारोळ बघायला मिळाला होता. सर्वच संघटनाकडून संताप व्यक्त करण्यात येत होता. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधकांमधील टीका शिगेला पोहोचली होती. निवडणूक स्थगितीचा मुद्दा न्यायालयातही जाऊन पोहोचला. अखेर विद्यापीठाने बहुप्रतीक्षित नोंदणीकृत पदवीधर गटाच्या अधिसभा निवडणुकीचा सुधारित कार्यक्रम जाहीर केला आहे.
नोंदणीकृत पदवीधर गटाच्या एकूण 10 जागांसाठी रविवार, 21 एप्रिल 2024 रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 5 या वेळेत मतदान होणार आहे. बुधवार, 24 एप्रिल 2024 रोजी सकाळी 9 वाजता फोर्ट संकुलातील सर कावसजी जहांगीर दीक्षान्त सभागृहात मतमोजणी करून निकाल जाहीर करण्यात येणार आहे. अनुसूचित जाती (1), अनुसूचित जमाती (1), विमुक्त जाती किंवा भटक्या जमाती (1), इतर मागास वर्ग (1), महिला (1) आणि खुला प्रवर्ग (5) अशा एकूण 10 जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. त्या निवडणुकीसाठी सोमवार, 30 ऑक्टोबर ते गुरुवार, 30 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 5, या कालावधीत पदवीधरांची मतदार नोंदणी हीींिीं:/र्/ाी.रल.ळप या संकेस्थळावरील ‘इलेक्शन 2022’ किंवा हीींिीं:/र्/ाी.शर्वीरिि.ले.ळप या संकेतस्थळावर ऑनलाइन पद्धतीने होणार आहे. त्यानंतर याच संकेतस्थळावर शुक्रवार, 1 डिसेंबर 2023 ते रविवार 25 फेब्रुवारी 2024 या कालावधीत मतदार नोंदणी अर्ज छाननी, आक्षेप व मतदारयादी (तात्पुरती मतदार यादी, सुधारित मतदार यादी आणि आक्षेप) प्रसिद्ध करण्यात येईल. त्यानंतर संकेतस्थळावरून सोमवार, 26 फेब्रुवारी 2024 रोजी अंतिम मतदारयादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे आणि गुरुवार, 29 फेब्रुवारी 2024 रोजी निवडणुकीची अधिसूचना काढण्यात येईल. विद्यापीठाने निवडणुकीच्या संपूर्ण कार्यक्रमासह नवीन मतदार नोंदणीची नियमावलीही जाहीर केली आहे. त्यानुसार मुंबई विद्यापीठाच्या सर्व पदवीधरांना पुन्हा नव्याने मतदार नोंदणीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरावे लागणार आहे. त्यामुळे यापूर्वी मोठ्या प्रमाणात पदवीधरांची मतदार म्हणून नाव नोंदणी केलेल्या विविध विद्यार्थी संघटनांना धक्का बसला आहे.
COMMENTS