नांदेड : मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला असून, मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा उपोषणाला सुरुवात केली आहे. दरम्यान, त्यांना पाठिंबा देण्यासाठी
नांदेड : मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला असून, मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा उपोषणाला सुरुवात केली आहे. दरम्यान, त्यांना पाठिंबा देण्यासाठी राज्यभरात आंदोलने सुरू आहे. मराठा आंदोलकांनी पुढार्यांना गावबंदी केली आहे. दरम्यान, नांदेड तालुक्यात गावात पुढार्यांना बंदी असतांना देखील खासदार प्रताप पाटील चिखलीकर हे नांदेडच्या कंधार तालुक्यातील अंबुलगा गावात गेले असता, यावेळी संतप्त आंदोलकांनी त्यांच्या गाड्यांची तोडफोड केली. ही घटना मध्यरात्री घडली.
पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप केल्याने मोठी घटना टळली. सरकारला मराठा आरक्षणासाठी 40 दिवसांची मुदत देऊनसुद्धा सरकारने कोणतेच पावले उचलली नसल्याने आता मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा जालना येथे उपोषणाला सुरुवात केली आहे. सरकारने आम्हाला फसवले असल्याची टीका करत जो पर्यन्त आरक्षण मिळत नाही तो पर्यन्त उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्णय जरांगे पाटील यांनी घेतला आहे. त्यांच्या या आंदोलनाला आता राज्यभरतून पाठिंबा मिळत आहे.
COMMENTS