Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुंबईकर उन्हाच्या तडाख्याने हैराण

मुंबई : मागील काही दिवसांपासून मुंबईत उन्हाचा तडाखा वाढला आहे. वाढता उकाडा नागरिकांसाठी त्रासदायक ठरत आहे. उन्हामध्ये सातत्याने काम केल्याने शरीर

बारावीच्या निकालात प्रवरेची गुणवता कायम
जिल्ह्यात 10 ठिकाणी अवैध धंद्यावर छापे; 3 लाखांचा मुद्देमाल जप्त ; 11जणांविरुद्ध गुन्हे
राहुल गांधींची जीभ छाटू नका, तर तिला चटके द्या !

मुंबई : मागील काही दिवसांपासून मुंबईत उन्हाचा तडाखा वाढला आहे. वाढता उकाडा नागरिकांसाठी त्रासदायक ठरत आहे. उन्हामध्ये सातत्याने काम केल्याने शरीरातील तापमान नियंत्रित करण्याच्या यंत्रणेत बिघाड होतो. परिणामी शरीरातील पाण्याची पातळी कमी होते. त्यामुळे कोणत्याही सुरक्षेशिवाय उन्हात फिरल्यास उष्माघाताचा त्रास होण्याची शक्यता डॉक्टरांकडून वर्तविण्यात येत आहे.
ऑक्टोबर हिटमध्ये उष्णता प्रचंड वाढत असल्याने नागरिकांना उलटी होणे, चक्कर येणे, निर्जलीकरण होणे, बेशुद्ध पडणे, उष्माघाताचा त्रास होतो. मागील काही दिवसांपासून मुंबईमध्ये उन्हाचा तडाखा वाढल्याने नागरिक हैराण झाले आहेत. मुंबईत आर्द्रता अधिक असल्याने उन्हाची तीव्रता अधिक जाणवत आहे. पुढील काही दिवस अशीच परिस्थिती राहिल्यास मुंबईकरांना त्याचा अधिक त्रास होण्याची शक्यता आहे. उन्हाच्या तडाख्यामध्ये शरीराचे तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी पुरेसे पाणी पिणे आवश्यक असते. उष्णतेमुळे नागरिकांनी पुढील दिवसांमध्ये अधिक काळजी घेण्याची आवश्यकता आहे, असे इंडियन सोसायटी ऑफ क्रिटिकल केअर ऑफ मेडिसिनच्या मुंबई शाखेचे सचिव डॉ. भरत जगियासी यांनी सांगितले. वातावरणातील बदलामुळे मागील काही दिवसांपासून मुंबईत उकाडा वाढत आहे. या वाढत्या उन्हात सातत्याने काम करणार्‍या नागरिकांना डोकेदुखी, लघुशंका करताना जळजळ होणे, पोटात दुखणे, चक्कर येणे यासारखे त्रास होण्याची शक्यता आहे. अनेकदा शरीराचे निर्जलीकरणही होते. त्यामुळे वाढती उष्णता लक्षात घेता नागरिकांनी काळजी घेणे आवश्यक आहे. उन्हात बाहेर पडणे टाळावे, बाहेर जायचे असल्यास डोक्यावर टोपी, डोळ्यावर गॉगल असणे आवश्यक आहे. तसेच पाण्याची बाटली कायम जवळ बाळगावी, अधिकाधिक फळे खावीत, जेणेकरून वाढत्या उन्हाचा त्रास फारसा होणार नाही, असे सेंट जॉर्जेस रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. विनायक सावर्डेकर यांनी सांगितले. उन्हामुळे थकवा येणे, गळून जाणे, चक्कर येणे, ताप येणे व पराकोटीच्या स्थितीत उष्माघात होणे, निर्जलीकरण होणे असे दुष्परिणाम होऊ शकतात.

COMMENTS