Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

महाबळेश्‍वरमध्ये मिरवणुकीत जनरेटरचा स्फोट

सातारा : सातारा जिल्ह्यातील महाबळेश्‍वरमध्ये देवीच्या मिरवणुकीदरम्यान, मोठा अपघात झाला आहे. देवीच्या मिरवणुकीत डीजेसाठी आणलेल्या जनरेटरचा अचानक स

IAS ऑफिसरला अटक | LokNews24
मराठा आरक्षण आणि घटनापीठ ! 
तीन कोटींच्या विम्याची हाव, महिलेने पतीला कारमध्ये जिवंत जाळलं! पहा सुपरफास्ट महाराष्ट्र | LokNews24

सातारा : सातारा जिल्ह्यातील महाबळेश्‍वरमध्ये देवीच्या मिरवणुकीदरम्यान, मोठा अपघात झाला आहे. देवीच्या मिरवणुकीत डीजेसाठी आणलेल्या जनरेटरचा अचानक स्फोट झाला. या स्फोटात 15 हून अधिक नागरीक जखमी झाले असून यात 8 ते 10 बालकांचा समावेश आहे. यातील काहींची प्रकृती ही चिंताजनक आहे. महाबळेश्‍वर येथील कोळी आळी मधील दुर्गा माता मंडळाच्या विसर्जन मिरवणुक काढण्यात येत होती. यावेळी डिजेसाठी जनरेटर आणले होते. दरम्यान, काही वेळाने जनरेटरच्या पेट्रोल पाईपला गळती लागली. यामुळे जनरेटरने अचानक पेट घेतला. या नंतर काही वेळातच भीषण स्फोट झाला.

COMMENTS