नाशिक : नवरात्रोत्सवाचे औचित्य साधत महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान नाशिकच्या वतीने जिल्ह्यातील तीर्थक्षेत्र स्थळी महिला बचत गटांच्या
नाशिक : नवरात्रोत्सवाचे औचित्य साधत महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान नाशिकच्या वतीने जिल्ह्यातील तीर्थक्षेत्र स्थळी महिला बचत गटांच्या वतीने उत्पादित वस्तूंचे स्टॉल्स हे उभारण्यात आले आहेत. नाशिक जिल्ह्यातील सप्तशृंगी गड, कोटमगाव देवी, रेणुका देवी भगुर, केद्राई माता मंदिर, वणीची देवी, घाटणदेवी व नाशिक शहराचे ग्रामदैवत कालिका माता मंदिर येथे महिला बचत गटांना स्टॉल्स उभारून देण्यात आले आहेत.
नवरात्रोत्सवात नाशिक जिल्ह्यातील तीर्थक्षेत्र स्थळी भाविक हे मोठ्या संख्येने दर्शनासाठी जात असतात, त्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान नाशिकच्या माध्यमातून जिल्ह्यातील तीर्थक्षेत्र स्थळांवर महिला बचत गटांच्या वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध होऊन त्यातून अर्थसहाय्य होण्याच्या उद्देशाने कळवण तालुक्यातील सप्तशृंगी गड, येवला तालुक्यातील कोटमगाव देवी मंदिर, नाशिक तालुक्यातील भगूर येथील रेणुका देवी मंदिर, चांदवड तालुक्यातील केद्राई माता मंदिर, नाशिक शहरातील कालिका मंदिर देवस्थान, दिंडोरी तालुक्यातील वणीची देवी, तालुका इगतपुरी तालुक्यातील घाटणदेवी येथे महिला बचत गटांना महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या माध्यमातून स्टॉल्स उभारून देण्यात आले आहे बचत गटातील महिलांच्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध व्हावी व महिला बचत गटांना अर्थसहाय्य व्हावे या उद्देशाने हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे घेण्यात आला आहे अशी माहिती माहिती जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक प्रतिभा संगमनेर यांनी दिली.
बचत गटांचा ब्रँड – इट वाइजली- उमेद अभियानाच्या वतीने नाशिक जिल्ह्यातील महिला बचत गटांच्या माध्यमातून इट वाईजली हा ब्रँड तयार करण्यात आला आहे, यामध्ये नागलीची बिस्कीट तयार करण्यात आली असून यात जवस देखील घालण्यात आले आहे, हे चविष्ट आणि रुचकर बिस्कीट देखील या स्टॉलवर उपलब्ध आहेत. जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील महिला बचत गटांच्या वतीने उत्पादित झालेल्या वस्तू या उत्तम प्रतीच्या असून नागरिकांनी या वस्तूंची खरेदी करून बचत गटातील उत्पादनांना प्रोत्साहन द्यावे. आशिमा मित्तल, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद नाशिक.
COMMENTS