Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

केडगाव देवीमंदीर परिसरातून लहान मुलाचे दागिने चोरण्याचा प्रयत्न 

दोन महिला ताब्यात

अहमदनगर : देवी दर्शनाला झालेल्या गर्दीचा फायदा घेऊन लहान मुलाच्या गळ्यातील सोन्याचे दागिने दोन महिलांनी चोरण्याचा प्रयत्न केला.पोलिसांनी पाठलाग क

पाण्याच्या वादातून कोयत्याने वार
 जामखेडमध्ये घरफोडी – लाखोंचा ऐवज लंपास
जामखेडमध्ये एसटीचा भोंगळ कारभार

अहमदनगर : देवी दर्शनाला झालेल्या गर्दीचा फायदा घेऊन लहान मुलाच्या गळ्यातील सोन्याचे दागिने दोन महिलांनी चोरण्याचा प्रयत्न केला.पोलिसांनी पाठलाग करुन दोघींना ताब्यात घेतले.ही घटना केडगाव देवी मंदिर परिसरात घडली. 

या बाबतची माहिती अशी की कोतवाली पोलिस केडगाव देवी मंदीर परीसरात पायी पेट्रोलिंग करीत असताना रेणुका माता मंदिराचे कमानी जवळ दर्शनासाठी मोठी गर्दी होती. त्यावेळी एका महिलेचा ओरडण्याचा आवाज आल्याने पोलिसांनी त्या ठिकाणी जाऊन चौकशी केली असता सविता विरकर, (रा. केडगाव अ.नगर) व तिचा लहान मुलगा सार्थक यांचेसह दर्शनासाठी आली होती. त्यावेळी तिचा मुलगा सार्थक यांचे गळयातील सोन्याची चैन दोन महिला पैकी एका महिलेने चोरी करण्याचा प्रयत्न केला. त्यातील एक महिला ही लाल रंगाची गोल्डन बॉर्डर असलेली साडी घातलेली व दुसरी लाल रंगाचा पंजाबी टॉप व पांढरे रंगाची सलवार व पांढरा व निळे रंगाचा ओढणी घातलेली आहे. या महिला लगबगीने केडगाव वेशीकडे जात आहे असे कळविले.

पोलिस त्या महिलेला घेवुन शोध घेतला असता काही अंतरावर अशा दोन्ही महिला दिसुन आल्याने त्या महिला सौ विरकर यांना दाखविले असता त्यांनी वरील वर्णनांचे महिला असल्यांचे सांगुन सार्थक यांचे गळयातील चैन लाल साडी घातलेले महिलेकडे बोट दाखवुन गर्दीत हिने मुलांचे गळ्यातील चैन जोरात ओढुन लाल रंगाचे पंजाबी ड्रेस घातलेले महिलेचे हातात देत असताना तिचा हात धरुन तिचे हातातुन मुलांची चैन काढुन घेवुन चोर चोर असे ओरडली, असता त्या दोन्ही महिला केडगाव वेशीच्या दिशेने घाई-घाईत पळत सुटल्या त्यामुळे विरकर यांनी आरडा ओरड केल्याने पोलिस व लोक जमा झाले.

त्या महिलांना जागेवर थांबवुन त्यांना त्याचे नाव गाव विचारले असता लाल रंगाची साडी नेसलेले महिलेने तिचे नाव कविता अंकल भोसले, (वय 30 वर्षे,रा.भानसहिवरे ता नेवासा) तसेच लाल रंगाचा पंजाबी ड्रेस घातलेले महिलेने तिचे नाव शिवकन्या विशाल भोसले, (वय 19 वर्षे, रा.भानसहिवरे ता नेवासा) असे नाव सांगितल्याने त्यांना पुढील चौकशी कामी ताब्यात घेतले.

COMMENTS