Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

साताऱ्यात भूकंपाचे सौम्य धक्के

सातारा - जिल्ह्यातून मोठी बातमी समोर येत आहे. कोयना धरण परिसराराला पुन्हा एकदा भूकंपाचे (Earthquake) सौम्य धक्के बसले आहेत. काल रात्री साडे अकरा

भूकंपाच्या धक्क्याने लातूर पुन्हा हादरले
मराठवाड्यासह विदर्भात भूकंपाचे सौम्य धक्के
राजधानीत दुसर्‍यांदा जाणवले भूकंपाचे धक्के

सातारा – जिल्ह्यातून मोठी बातमी समोर येत आहे. कोयना धरण परिसराराला पुन्हा एकदा भूकंपाचे (Earthquake) सौम्य धक्के बसले आहेत. काल रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास भूकंप होत असल्याचे जाणवू लागले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवित आणि वित्तहानी झाली नाही. साताऱ्यात याआधी ऑगस्ट महिन्यात भूकंप झाला होता. त्यावेळचाही भूकंप सौम्यच होता. आताही दोन महिन्यांनंतर पुन्हा भूकंप झाला आहे. या भूकंपाची तीव्रता 3.3 रिश्टर स्केल इतकी नोंदविण्यात आली. या भूकंपाने नागरिक मात्र चांगलेच घाबरले होते. भूकंपाचे धक्के जाणवू लागताच नागरिकांची पळापळ सुरू झाली होती.  काही जणांनी तर रात्र अक्षरशः जागून काढली. काल रात्री हा भूकंप झाला. भूकंपाचा केंद्रबिंदू नेमका कुठे होता याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. या घटनेत कोणतेही नुकसान झालेले नाही. कोयना धरणही सुरक्षित असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. साताऱ्यात दोन महिन्यात दुसऱ्यांदा भूकंप झाला आहे. याआधी ऑगस्ट महिन्यात साताऱ्यासह कोल्हापुरात भूकंप झाला होता. त्यावेळचाही भूकंप सौम्य होता त्यामुळे नुकसान झाले नाही.

COMMENTS