Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कृषी विभाग चा दिंद्रुड येथे महिला किसान गोष्टी कार्यक्रम संपन्न

माजलगाव प्रतिनिधी - कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा अंतर्गत श्री सुभाष साळवे प्रकल्प संचालक आत्मा बीड यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका कृष

मतदानाची टक्केवारी वाढविण्यावर भर द्या : श्रीकांत देशपांडे
भारतीय कर्णधार सुनील छेत्री होणार बाबा !
कोलकात्यात कनिष्ठ डॉक्टरांचा संप सुरूच

माजलगाव प्रतिनिधी – कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा अंतर्गत श्री सुभाष साळवे प्रकल्प संचालक आत्मा बीड यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका कृषी अधिकारी माजलगाव च्या वतीने ,काल दि 16 रोजी महिला किसान दिनानिमित्त महिला किसान गोष्टी कार्यक्रम तालुक्यातील दिंद्रुड येथे घेण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक श्री गोपीनाथ पवार तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक माजलगाव यांनी केले यावेळी उपस्थित महिलांना रब्बी हंगामातील पिकाची लागवड, बीज प्रक्रिया ,आत्मा योजना, सेंद्रिय शेती ,आणि कृषी विभागातील विविध योजना तसेच कृषी क्षेत्रातील महिलांचे योगदान याविषयी मार्गदर्शन केले प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित असलेले श्री शिवराज फाटे प्रगतशील शेतकरी यानी महिलांना रेशीम शेती मध्ये खूप मोठया प्रमाणावर संधी असून इतर पिका पेक्षा मोठ्या प्रमाणावर उत्पन्न मिळत आहे त्यामुळे महिलांनी रेशीम शेती मध्ये रोजगार उपलब्ध होत आहे याविषयी मार्गदर्शन केले ,श्री रामेश्‍वर धपाटे जिल्हा संशोधन व्यक्ती यानी प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया योजना अंतर्गत विविध प्रक्रिया उद्योग उभारण्यासाठी अर्ज,प्रकल्प अहवाल कशाप्रकारे तयार करावा तसेच यातून मिळणारे अनुदान व कर्ज याविषयी महिलांना मार्गदर्शन केले यावेळी निर्माण श्री सेवाभावी संस्थेचे श्री अशोक बिक्कड, बालाजी सुवर्णकार आणि बाबा पोटभरे यांनी महिलांना विविध उधोग,शासकीय योजना व उपक्रम या विषयी माहिती सांगितली यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीमती सौ. चंद्रकला कथरे अध्यक्ष ग्रामसंघ,प्रमुख उपस्थिती श्रीमती यशोदा चांदबोदले सचिव ग्रामसंघ, श्रीमती सरिता गिराम ,श्रीमती बसेटवार, श्रीमती मनीषा आणि महिला बचत गटातील महिला मोठ्या प्रमाणावर उपस्थित होत्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डी.एम. सरवदे कृषी सहाय्यक यांनी केले आभार प्रदर्शन श्री बाजीराव काशीद यांनी मांडले.

COMMENTS