पालकमंत्री घेणार अखेर जिल्ह्यातील कोविडचा आढावा

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पालकमंत्री घेणार अखेर जिल्ह्यातील कोविडचा आढावा

ग्रामविकास मंत्री व नगर जिल्हयाचे पालकमंत्री हसन मुश्रीफ येत्या शनिवारी (दि. 17 एप्रिल) नगर जिल्ह्यात येणार असून, या दौर्‍यात कोरोनाच्या जिल्ह्यातील सद्यस्थितीचा आढावा ते घेणार आहेत.

दुभंगलेली मने जुळवण्याचे काम न्या. नेत्रा कंक यांनी केले
नगर अर्बनच्या त्या ठेवीदारांनी न्यायालयात जाण्याची गरज
अहमदनगर शहरात स्वच्छतेचा बोजवारा… कचरा महापालिकेत आणून टाकण्याचा इशारा

अहमदनगर/प्रतिनिधी- ग्रामविकास मंत्री व नगर जिल्हयाचे पालकमंत्री हसन मुश्रीफ येत्या शनिवारी (दि. 17 एप्रिल) नगर जिल्ह्यात येणार असून, या दौर्‍यात कोरोनाच्या जिल्ह्यातील सद्यस्थितीचा आढावा ते घेणार आहेत. शिर्डी, कोपरगाव व नगरला याबाबत त्यांच्या बैठका होणार आहेत.

शनिवारी सकाळी 9 वाजता शिर्डी येथील कोविड केअर सेंटर व 250 बेड्सच्या कोविड हेल्थ केअर सेंटरची पाहणी ते करणार असून, सकाळी 10 वाजता राहाता तालुक्यातील कोरोना सद्यस्थिती, उपाययोजना, लसीकरणाबाबत आढावा बैठक शिर्डीतील श्री साईबाबा हॉस्पीटल हॉलमध्ये घेणार आहेत. त्यानंतर ते कोपरगावला जाणार असून, तेथे सकाळी 11 वाजता कोविड केअर सेंटर, एसएसजीएम कॉलेज कोपरगाव पाहणी केल्यानंतर तेथीलच महात्मा गांधी चॅरिटेबल ट्रस्ट येथील 300 बेड्स कोविड सेंटरची पाहणी करणार आहेत. त्यानंतर सकाळी 11.30 वाजता कोपरगाव तालुक्यातील कोरोना सद्यस्थिती, उपाययोजना, लसीकरणाबाबत आढावा बैठक कोपरगावच्या कृष्णाई मंगल कार्यालयात घेणार आहेत. त्यानंतर दुपारी 3 वाजता जिल्हयातील कोरोना सद्यस्थितीचा आढावा, लसीकरण व त्यावरील उपाययोजना याबाबत आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात घेणार असून, सायंकाळी 4 वाजता पत्रकारांशी संवाद साधणार आहेत.

COMMENTS