केज - केज शहरात प्रतिवर्षा प्रमाणे याही वर्षी रोटरी क्लब ऑफ केजच्या वतीने दिनांक 20 ऑक्टोबर ते 22ऑक्टोबर दरम्यान महिलांसाठी ’होम मिनिस्टर’,दांडिय
केज – केज शहरात प्रतिवर्षा प्रमाणे याही वर्षी रोटरी क्लब ऑफ केजच्या वतीने दिनांक 20 ऑक्टोबर ते 22ऑक्टोबर दरम्यान महिलांसाठी ’होम मिनिस्टर’,दांडिया स्पर्धा व शालेय विद्यार्थ्यांसाठी डान्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
केज रोटरी क्लब दरवर्षी नवरात्र महोत्सवात सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करत आहे. यावर्षी महिलांसाठी होम मिनिस्टर व दांडिया सारखे खेळ घेण्यातयेणार आहेत.यावर्षी 20 ऑक्टोबर,शुक्रवार रोजी सायंकाळी ठीक 5-00 वाजता दांडिया स्पर्धा होणार आहेत.तर शनिवार दि.22 रोजी शहरातील महिलांचा आवडता खेळ होम मिनिस्टर अर्थात केज स्मार्ट श्रीमती या खेळाचे आयोजन सायंकाळी ठीक 4-00 वाजता करण्यात आले आहे.रविवार दि.22 ऑक्टोबर रोजीसायंकाळी ठीक 5-00 वाजता केज च्या मुला-मुलींसाठी डान्स स्पर्धा ठेवण्यात आल्या आहेत.यामध्ये दोन गट राहतील.इयत्ता 5 वी पर्यंत एक गट व त्यापुढील सर्व खुला गट राहील.यावर्षी स्पर्धेचे ठिकाण स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कुल, धारूर रोड येथे असणार आहे.या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी स्पर्धकांनी आपली नांवे,स्वतःचे पूर्ण नांव,पत्ता,मोबाईलक्रमांक,व ज्यामध्ये सहभाग घेत आहोत त्या प्रकाराचे नांव, डान्स स्पर्धकांनी आपले गाण्याचे नाव इत्यादी माहिती द्यावी.डान्स स्पर्धेच्या स्पर्धकांनी आपले गाणे स्वतंत्र पेन ड्राइव्ह मध्ये आणावे जेणेकरून व्यत्यय येणार नाही.सर्वच स्पर्धकांनी आपली नांवे 19ऑक्टोबर 2023 रोजी सायंकाळी 5-00 वाजेपर्यंत नोंदवावीत असे आवाहन केज रोटरी क्लबचेअध्यक्ष रो.श्रीराम शेटे व सचिव रो.अरुण नगरे यांनी केले आहे.नांव नोंदणीसाठी खालील रोटरी सदस्यांकडे संपर्क करण्याचे आवाहन ही त्यांनी केले आहे.नाव नोंदणी रो.श्रीराम शेटे अध्यक्ष-9960012504, रो.अरुण नगरे सचिव 9422485733,रो.प्रा.डॉ.बी.जे.हिरवे,रो.हनुमंत भोसले 9423733888, रो.श्रीराम देशमुख 9075754444, रो.सूर्यकांत चवरे- 9860651023, रो.प्रवीण देशपांडे- 9420032555, रो.विकास मिरगणे -9422470720,रो.दादा जमाले-9823772333, रो.अरुण अंजाण -9420658811, रो.बापूराव शिंगण, रो.डी.एस.साखरे यांच्या कडे नोंदवावीत.दिलेल्या तारखेनंतर कोणताही प्रवेश स्वीकारला जाणार नाही.असे रोटरी क्लबचे अध्यक्ष रो.श्रीराम शेटे व रो.अरुण नगरे यांनी कळवले आहे.
COMMENTS