Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

रोटरी क्लब ऑफ नाशिक गोदावरीचा एक सामाजिक उपक्रम

नाशिक : नवरात्रोत्सव निमित्त रोटरी क्लब ऑफ नाशिक गोदावरीचा वतीने गोदागरबा २०२३ आदिवासीची स्वप्नपूर्ती कार्यक्रमाचे आयोजन शगुन हॉल नंदनवन लॉन्स, न

रेनबो स्कूलचे जिल्हास्तरीय बास्केटबॉल स्पर्धेत यश
Jio ने दोन नवीन रिचार्ज प्लॅन लाँच केले
मां जिजाऊंची बदनामी महाराष्ट्र कदापि विसरणार नाही!

नाशिक : नवरात्रोत्सव निमित्त रोटरी क्लब ऑफ नाशिक गोदावरीचा वतीने गोदागरबा २०२३ आदिवासीची स्वप्नपूर्ती कार्यक्रमाचे आयोजन शगुन हॉल नंदनवन लॉन्स, नाशिक येथे करण्यात आले. या कार्यक्रमाच्या माध्यमातून निधी संकलित करण्यात येणार आहे. या संकलित निधीचा वापर थॅलेसेमिया रुग्णांसाठी रक्त उपलब्ध करून देण्यासाठी तसेच ग्रामीण भागातील मुलासाठी उत्तम दर्जाचे आरोग्य सेवा उपलब्ध व्हावी, शैक्षणिक क्षेत्रात शालेय मुलांना शिक्षणाचा दर्जा उंचावेल व त्यांना सक्षम बनविण्याचे काम करणार, महिलांसाठी स्वरक्षणाचे प्रशिक्षण देण्यात येईल तसेच महिलांसाठी व्यावसायिक प्रशिक्षण देऊन त्यांना स्वतःच्या पायावर आर्थिक सक्षम होतील या साठी काम करणार, गर्भवती माता साठी योग्य आहार, मानसिक आरोग्य, समुपदेशन या विषयावर जनजागृती अभियान राबविण्यात येईल. युवकांना उत्तम प्रतीचे शिक्षण मिळावे यासाठी गाव तेथे युवा केंद्र स्थापन करणार आहोत. या सामाजिक उपक्रमात आपण सर्वानी एकत्र येऊन सहभागी व्हावे असे आवाहन रोटरी क्लब ऑफ नाशिक गोदावरीच्या अध्यक्षा डॉ. संगीता  लोढा, सचिव सुरेश चावला यांनी केले आहे.

COMMENTS