Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

रत्नागिरी सा.बां.ची ‘निर्माण इन्फ्रास्ट्रक्चर’वर ‘अर्थ’पूर्ण कृपादृष्टी !

1 कोटी 57 लाखाच्या टेंडरमध्ये भ्रष्टाचाराचा केंद्रबिंदू डॉ. अशोक सोनवणे यांजकडून विशेष वृत्त

मुंबई ः रत्नागिरी सार्वजनिक बांधकाम विभागात प्रचंड अनागोंदी आणि अर्थपूर्ण कृपादृष्टी असलेले व्यवहार पूर्णत्वास नेण्यास अधीक्षक अभियंता श्रीमती छा

विधिमंडळांत बार्टीसह सचिव सुमंत भांगेची ‘पोलखोल’
सार्वजनिक बांधकाम उत्तर विभाग पुणे
बार्टीच्या प्रशिक्षण कार्यक्रमावर मंत्री देसाईंची उत्तर देतांना दमछाक

मुंबई ः रत्नागिरी सार्वजनिक बांधकाम विभागात प्रचंड अनागोंदी आणि अर्थपूर्ण कृपादृष्टी असलेले व्यवहार पूर्णत्वास नेण्यास अधीक्षक अभियंता श्रीमती छाया नाईक आणि कार्यकारी अभियंता अमोल ओटवणेकर यांची विशेष मर्जी दिसून येत आहे. रत्नागिरी येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दुसर्‍या मजल्यावरील जिल्हा नियोजन भवन हॉल निर्मितीच्या कामाची कोणतीही वर्क ऑर्डर नसतांना, निधीची मंजूरी नसतांना, शिवाय कोणत्याही बांधकाम क्षेत्रातील अनुभव नसतांना, मेसर्स निर्माण इन्फ्रास्ट्रक्चर या संस्थेला वरील काम देण्यात आले आहे.

जिल्हा नियोजन भवन हॉल निर्मितीचे कामकाज 50 टक्के पूर्ण झाले असून, उर्वरित कामही पूर्णत्वात जात आहे. मात्र या कामाची कोणतीही वर्क ऑर्डर न काढता, कोणत्याही निधीची मंजूरी नसतांना, मेसर्स निर्माण इन्फ्रास्ट्रक्चर कुणाच्या आदेशानुसार हे काम करत आहे, हा मोठा गहन प्रश्‍न आहे. त्यामुळे यासंदर्भात मोठे अर्थपूर्ण व्यवहार झाले असण्याची शक्यता असून, त्या जोरावरच मेसर्स निर्माण इन्फ्रास्ट्रक्चर काम पूर्णत्वास नेतांना दिसून येत आहे. त्यामुळे रत्नागिरी सार्वजनिक बांधकाम विभागातील अनागोंदी रोखण्याची मागणी पुढे येतांना दिसून येत आहे.

यासंदर्भातील कामाचे टेंडर सुरूवातीला 1 कोटीचे काढण्यात आले होते. यासाठी छत्रपती संभाजीनगर येथील स्वस्तिक या संस्थेने टेंडर भरले होते. मात्र आपल्या मर्जीतील कंत्राटदाराची निविदा न आल्यामुळे स्वस्तिकचे टेंडर उघडण्याची स्वारस्यता रत्नागिरी सार्वजनिक बांधकाम विभागाने दाखवली नाही. शिवाय अधीक्षक अभियंता अभियंता छाया नाईक आणि कार्यकारी अभियंता अमोल ओटवणेकर यांनी ते टेंडरच रद्द करण्याचा प्रताप केला. त्यानंतर याच टेंडरची किंमत 1 कोटीवरून 1 कोटी 57 लाखाचे नवीन टेंडर काढण्यात आले. या टेंडरसाठी ज्या निविदा आल्या त्यातील फक्त एकच निविदा उघडण्यात आली. त्याचबरोबर स्वस्तिक या संघटनेने सर्वात कमी रकमेची निविदा दाखल करूनही, त्यांची निविदा उघडली गेली नाही. त्यामुळे इतर कोणत्याही निविदा न उघडता अधीक्षक अभियंता आणि कार्यकारी अभियंता यांना कसे कळून चुकले की, इतर निविदा या अधिक रकमेच्या आहेत? हा मोठा गहण प्रश्‍न आहे. त्याचबरोबर प्रथम टेंडर 1 कोटीचे आणि त्याच कामासाठी दुसरे टेंडर 1 कोटी 57 लाखाचे. त्यामुळे 57 लाख रूपये कुणाच्या घशात जाणार आहे, त्यासाठी कशापद्धतीचे नियोजन करण्यात आले, यासंदर्भातील सविस्तर माहिती दैनिक लोकमंथनच्या हाती आलेली आहे. त्यामुळे रत्नागिरी सार्वजनिक बांधकाम विभागाने आतातरी या कामाला स्थगिती देवून या कामाची चौकशी करण्याचे सौजन्य दाखवण्याची गरज आहे. रत्नागिरी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या या अनागोंदी कारभारावर सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव संजय दशपुते आणि कोकण विभागाचे मुख्य अभियंता शरद राजभोज यांनी कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

‘मेसर्स निर्माण इन्फ्रास्ट्रक्चर’ला केवळ फर्निचरसंदर्भातील कामाचा अनुभव – रत्नागिरी सार्वजनिक बांधकाम विभाग जिल्हा नियोजन भवन हॉलचे काम ज्या स्वस्तिक संस्थेकडून करून घेत आहे, त्या ‘मेसर्स निर्माण इन्फ्रास्ट्रक्चर’ला संस्थेला केवळ बांधकामाचा अनुभव असून, फर्निचरसंदर्भातील कोणत्याही कामाचा अनुभव नाही. तसेच या संस्थेकडे कोणती मशीनरी आहे, याची कोणतीही यादी दिलेली नाही. त्या मशीनरीच्या कोणत्याही पावत्या जोडलेल्या नाहीत. असे असतांना देखील या संस्थेला हॉल निर्मितीचे कामकुणाच्या मर्जीनुसार देण्यात आले, असा सवाल निर्माण होत आहे. त्यामुळे ही संस्था हॉल निर्मितीचे काम सदोष करेल, यातही शंकाच आहे. त्यामुळे या कामकाजाशी कुणाचे लागेबांधे जोडलेले आहेत, याची चौकशी करण्याची मागणी जोर धरतांना दिसून येत आहे.

अधीक्षक अभियंता श्रीमती नाईक आणि ओटवणेकर मेहेरबान का ? – खरंतर कोणत्याही टेंडर प्रक्रियेमध्ये पारदर्शकता पाळणे गरजेचे असते. त्याचबरोबर आपण ज्या संस्थेला टेंडर देत आहे, त्याचा त्या क्षेत्रातील कामाचा अनुभव किती आहे, याचीही खात्री अधिकार्‍यांनी करणे गरजेचे असते. मात्र अधीक्षक अभियंता श्रीमती छाया नाईक आणि कार्यकारी अभियंता अमोल ओटवणेकर यांनी सर्व नियम पायदळी तुडवत ‘मेसर्स निर्माण इन्फ्रास्ट्रक्चर’ला रत्नागिरी येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दुसर्‍या मजल्यावरील जिल्हा नियोजन भवन हॉल निर्मितीचे टेंडर दिले. स्वस्तिकचे टेंडर सर्वात कमी किंमतीचे असतांना, ‘मेसर्स निर्माण इन्फ्रास्ट्रक्चर’वर रत्नागिरी सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकारी स्वस्तिकवर इतके मेहरबान का ? असा सवाल उपस्थित होत आहे. रत्नागिरी सा.बां. मंडळातील अनेक कारनामे, कणकवली, सिंधुदुर्ग, विभागात झालेल्या गैरव्यवहाराचा पर्दाफाश लवकरच.

लवकरच – सन 2019 ते 2021 या कार्यकाळात राष्ट्रीय महामार्गातील कामांमध्ये रत्नागिरी विभागात झालेल्या भ्रष्टाचाराचा पर्दाफाश लवकरच.

COMMENTS