Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

ईडीची राज्यभरात छापेमारी

350 कोटींच्या 70 मालमत्ता जप्त

जळगाव ः अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीकडून रविवारी सकाळी राज्यभरात छापेमारी करण्यात आली. या छापेमारीत जळगाव, मुंबई, ठाणे, सिल्लोड आणि कच्छमधील ए

पंजाबमध्ये ईडीचे 13 ठिकाणी छापे
ईडीची बंगाल, तामिळनाडूमध्ये छापेमारी
उद्धव ठाकरेंच्या निकटवर्तींयांवर ‘ईडी’चे छापे

जळगाव ः अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीकडून रविवारी सकाळी राज्यभरात छापेमारी करण्यात आली. या छापेमारीत जळगाव, मुंबई, ठाणे, सिल्लोड आणि कच्छमधील एकूण अंदाजे 315 कोटींची 70 मालमत्ता जप्त करण्यात आल्या आहेत. याबाबत सविस्तर माहिती अशी की, राजमल लाखीचंद ज्वेलर्स प्रायव्हेट लिमिटेड, आर एल गोल्ड प्रायव्हेट लिमिटेड व मनराज ज्वेलर्स प्रायव्हेट लिमिटेड आणि इतरच्या बँक फसवणूक प्रकरणात ईडीने मोठी कारवाई केली आहे.
या कारवाईमध्ये जळगाव, मुंबई, ठाणे, सिल्लोड आणि कच्छमधील 70 स्थावर मालमत्ता आणि जंगम मालमत्ता तात्पुरत्या स्वरुपात जप्त करण्यात आल्या आहेत. या जप्त केलेल्या मालमत्तांची किंमत अंदाजे 315 कोटी  आहे. दरम्यान, ईडीकडून याआधीही जळगावमधील राजमल लाखीचंद ज्वेलर्सवर छापेमारी करण्यात आली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार ईश्‍वरलाल जैन यांच्या मालकीचे असलेल्या या ज्वेलर्सवर ऑगस्ट महिन्यात छापा टाकण्यात आला होता. यावेळी तब्बल 24 तासांपासून अधिक काळ दुकानाची चौकशी करण्यात आली होती.

COMMENTS