Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

चतु:श्रृंगी देवीच्या मंदिरात उसळली भाविकांची गर्दी

पुणे प्रतिनिधी : देशभरात रविवारपासून शारदीय नवरात्र उत्सवाला सुरुवात झाली आहे. पुण्यातील चतु:श्रृंगी देवीच्या मंदिरात सकाळपासून हजारो भाविकांनी ए

शेकापचे ज्येष्ठ नेते केशवराव धोंडगे यांचे निधन
सोनईमध्ये पाळला कडकडीत बंद
गणेश चतुर्थीसाठी जाणाऱ्या रेल्वे गाड्यांच्या बुकींगमध्ये घोळ

पुणे प्रतिनिधी : देशभरात रविवारपासून शारदीय नवरात्र उत्सवाला सुरुवात झाली आहे. पुण्यातील चतु:श्रृंगी देवीच्या मंदिरात सकाळपासून हजारो भाविकांनी एकच गर्दी केली आहे. तर त्या पार्श्‍वभूमीवर चतु:श्रृंगी देवीच्या मंदिराचा इतिहास विश्‍वस्त नंदकुमार अनगळ यांच्याकडून जाणून घेतला आहे. ते यावेळी म्हणाले की, पेशव्याच्या काळात दुर्लबशेठ पीतांबरदास हे सावकार होते. ते पेशव्यांच्या मोहिमांना कर्ज द्यायचे की, ते तेवढे श्रीमंत होते. ते नाशिकच्या वणीच्या सप्तश्रृंगी मातेचे भक्त होते.
प्रत्येक चैत्र आणि अश्‍विन पौर्णिमेच्या दोन्ही नवरात्रोत्सवात हे दर्शनासाठी जायचे आणि देवीची सेवा करायचे. अनेक वर्ष त्यांनी देवीची सेवा केली. मात्र त्यांना वृद्धापकाळाने वणीला जाणं शक्य नव्हतं. आपल्याला देवीची सेवा करता येणार नसल्याने त्यांना फार दुख: झाले. त्यावेळी देवीने त्यांचे दुख: जाणले आणि देवीने त्यांना स्वप्नात दृष्टांत दिला. डोंगरावर उत्खनन कर आणि त्या ठिकाणी तांदूळ स्वरूप मूर्ती सापडेल असे सांगितले. त्यावर दुर्लबशेठ पीतांबरदास डोंगरावर उत्खनन करण्यास सुरुवात केली आणि 1762 साली चैत्र पोर्णिमेच्या दिवशी चतु:श्रृंगी देवीची मूर्ती सापडली आहे. देवीच्या मूर्तीच्या वैशिष्टयाबाबत सांगायचे झाल्यास, तांदळा स्वरूपामध्ये देवीची मुखवट्यामध्ये मूर्ती बसलेली आहे. तर एका बाजूला मूर्ती झुकलेली आहे. सप्तश्रृंगी मातेसारखी मूर्ती असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच ते पुढे म्हणाले की, नवरात्र उत्सवाला आज पासून सुरुवात होत आहे. त्या पार्श्‍वभूमीवर आज मंदिरात जय्यत तयारी करण्यात आली असून दर्शन रांगा, सीसीटीव्ही कॅमेरा आणि भाविकांच्या सुरक्षेकरिता यंत्रणा सज्ज ठेवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. 

COMMENTS