Homeताज्या बातम्यादेश

गाझापट्टीत भयावह दृश्ये

मृतदेहांचा खच ; निष्पाप नागरिकांचे हाल

नवी दिल्ली ः गेल्या काही दिवसांपासून पॅलेस्टाईनच्या दहशतवादी संघटना हमासकडून इस्त्राईलवर सुरू असलेल्या हल्ल्यानंतर ईस्त्रायलकडून चोख प्रत्युत्तर

हा फक्त ट्रेलर पिक्चर अजून बाकी ; आशिष शेलारांच्या वक्तव्याने पुन्हा ट्विस्ट
तलावात बुडून ५ मुलांचा मृत्यू
ऐश्वर्याच्या ‘पोनियिन सेल्वन 2’ चित्रपटाचा धुमाकूळ

नवी दिल्ली ः गेल्या काही दिवसांपासून पॅलेस्टाईनच्या दहशतवादी संघटना हमासकडून इस्त्राईलवर सुरू असलेल्या हल्ल्यानंतर ईस्त्रायलकडून चोख प्रत्युत्तर देण्यात येत आहे. गाझापट्टी खाली करण्याचे निर्देश इस्त्रायलने येथील नागरिकांना दिले होते, त्यानंतर इस्त्रायलने अतिशय विध्वंस येथे घातला असून, मृतदेहांचा खच पडला आहे. येथील दृश्य भयावह असून, निष्पाप नागरिकांचे हाल पाहून अनेकांचे डोळे पाणावतांना दिसून येत आहे.
गाझापट्टीमध्ये सध्या वास्तव्यास असलेल्या नागरिकांना अक्षरशः जीव मुठीत घेऊन जगावे लागत आहे. ‘घरामध्ये बसलो तरीसुद्धा हवाई हल्ल्याचा धोका आणि बाहेर पडावे तरीसुद्धा बाँबहल्ल्यात मरण पावण्याचा धोका,’ अशा दुहेरी संकटामध्ये आम्ही सापडलो आहोत,’ अशी भीती स्थानिक नागरिक व्यक्त करताना दिसतात. ‘हा आमच्या जीवन-मरणाचा प्रश्‍न आहे पण त्यावर उत्तर नाही’ अशी हतबलतेची भावना रुग्णालयात काम करणार्‍या जमाल (वय 34) यांनी व्यक्त केली. आमच्यासाठी आता एकही सुरक्षित जागा उरलेली नाही किंवा एकही हक्काचे ठिकाण राहिलेले नाही, असे सांगताना त्यांच्या डोळ्यांत अश्रू तरळले. इस्राईलने हल्ल्याचा इशारा दिल्यानंतर आता गाझापट्टीमध्ये मोठ्या प्रमाणावर स्थलांतर सुरू झाले आहे. उत्तरेकडील भागामध्ये राहणार्‍या तब्बल दहा लाख लोकांनी दक्षिणेकडे स्थलांतर सुरू केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या स्थलांतराबाबत संयुक्त राष्ट्रांनी आधीच सावधगिरीचा इशारा दिला होता. लोकांनी मिळेल ते वाहन पकडून तसेच गाढवांच्या गाड्यांत बसून दक्षिणेकडे स्थलांतर सुरू केले आहे. इस्राईलने शुक्रवारी रात्रीपासूनच गाझामध्ये खोलवर मारा करायला सुरूवात केली आहे. या स्थलांतर करत असलेल्या लोकांवर देखील इस्राईलने बाँबवर्षाव केला असून त्यात सत्तरपेक्षा अधिक स्थानिक लोक मारल्या गेल्याचा दावा ‘हमास’कडून करण्यात आला.

COMMENTS