Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

दरडगाव थडी मायराणीतील भाजप कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश

राहुरी/प्रतिनिधी ः दरडगाव थडी मायराणी ता. राहुरी येथील भाजप कार्यकर्त्यांनी आमदार प्राजक्त तनपुरे ह्यांचे उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्र

श्रम व ज्ञानशीलतेचा संदेश देणारी पुस्तके प्रत्येक घरात असावीत – सुभाष देशमुख
भारनियमनात दिलासा…अतिरिक्त वीज उपलब्ध
चायना मांजाने कापला पाच वर्षीय मुलीचा गळा

राहुरी/प्रतिनिधी ः दरडगाव थडी मायराणी ता. राहुरी येथील भाजप कार्यकर्त्यांनी आमदार प्राजक्त तनपुरे ह्यांचे उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी शेरी चिखलठाणचे सरपंच डॉ सुभाष काकडे हेही उपस्थित होते. यावेळी बोलताना आमदार तनपुरे म्हणाले की नव्याने राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांनी पक्षांचे प्रामाणिक काम करावे पक्षामध्ये निश्‍चित मान सन्मान केला जाईल. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार साहेब ह्यांचे विचार पक्षाची ध्येय धोरणे सर्व सामान्य जनतेपर्यंत पोहचविण्याचे काम करण्याचे आवाहन केले.
यावेळी दरडगाव थडी येथील भाजप कार्यकर्त्यांनी आमदार प्राजक्त दादा तनपुरे यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश केला. यामध्ये दरडगाव सोसायटीचे संचालक अशोक शिंदे, नवनाथ माने, भारत गांडाळ ,राजू गांडाळ, रामा गांडाळ, सुरेश गांडाळ, अण्णा गांडाळ, विलास काळे, खेमा काळे, झुंबर काळे, अशोक काळे, राजू काळे, लहानू काळे, भीमा काळे, दीपक गावडे, देमा गांडाळ, भीमा माळी, ठकसेन माळी, अनिल बर्डे, सुरज बर्डे, संदीप माळी, युवराज बर्डे, शुभम पवार, संकेत बर्डे, जय बर्डे, आदिनाथ बर्डे, सुनील बर्डे, किरण माळी यासह असंख्य कार्यकर्त्यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी शेरी चिखलठाण रामकिसन जाधव, भारत रोकडे, अशोक रोकडे, दत्तात्रय हारदे, चेअरमन नानाभाऊ हांडे, नवनाथ हारदे, अण्णासाहेब रोकडे, बापूसाहेब रोकडे, दादाराम जाधव, राजेंद्र जाधव, प्रवीण जाधव, शशिकांत हांडे, मच्छिंद्र रोकडे, सुरेश हारदे, सुभाष शिंदे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

COMMENTS