Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राष्ट्रवादीचा काँग्रेस जामखेड तालुकाध्यक्ष कोण?

आमदार रोहित पवारांचा निर्णय ठरणार अंतिम

जामखेड ः जामखेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारिणीमध्ये आमदार रोहित पवार लवकरच मोठे बदल करणार असल्याची ंखात्रीलायक माहिती आहे. आगामी काळ

रोहित पवार यांच्या हटके टी-शर्टची विधीमंडळात चर्चा
आ. रोहित पवारांसमोरच दोन गटात हाणामारी (Video)
आमदार रोहित पवारांना ईडीचे समन्स

जामखेड ः जामखेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारिणीमध्ये आमदार रोहित पवार लवकरच मोठे बदल करणार असल्याची ंखात्रीलायक माहिती आहे. आगामी काळात लोकसभा विधानसभ, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपरिषद अशा मोठ्या निवडणुका जवळ येत आहेत, अशावेळी आमदार रोहित पवार तालुकाध्यक्षपदाची जवाबदारी कोणाला देतात याकडे तालूक्याचे लक्ष लागले आहे.
काही महिन्यांपूर्वी राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा गट तयार होऊन भाजपबरोबर सत्तेत सहभागी झाले आहेत. त्यानंतर शरद पवार यांची मूळ राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आ रोहित पवार राज्यात सर्वच आघाडयांवर राष्ट्रवादी काँग्रेसची धूरा संभाळत असतांना दिसत आहेत. मात्र जामखेड कर्जत मतदारसंघात उघडपणे बोलत नसले तरी, राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते अजितदादा की रोहितदादा कोणत्या दादाकडे रहावे याबाबत संभ्रमित आहेत. तसेच सत्ताबदलानंतर याठिकाणी आ राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली भाजप पुन्हा एकवटली असून, आमदार प्रा. राम शिंदे यांची मतदारसंघातील पकड मजबूत होतांना दिसत आहे. त्यातच आमदार रोहित पवार यांचे कार्यकर्त्यांना पाठबळ मिळत नसल्याची पदाधिकारी व कार्यकर्त्यांची खंत जूनीच आहे. अशा वेळी राष्ट्रवादी काँग्रेसला संघटन कौशल्य व सर्वसमावेशक नेतृत्व असलेला तालुकाध्यक्षपदासाठी योग्य चेहरा कोण? आमदार रोहित पवार यांच्या नजरेत आहे तरी कोण ? राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सर्वांच्या पसंतीस उतरणारा तसेच तालुक्यात राजकीय पकड असलेला, तालुकाध्यक्षपदासाठी सक्षम नेतृत्व करणारा नवा चेहरा कोण? याचे उत्तर आमदार रोहित पवार यांच्याकडेच आहे. तालुकाध्यक्षासह कार्यकारिणी निवडीचा आमदार रोहित पवार लवकरच निर्णय घेणार आहेत . त्यामुळे अनेक कार्यकर्त्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

आम्हालाही विचारात घ्या ? – नेतृत्व कौशल्य पाहुन तालूकाध्यक्षपदाची जवाबदारी कोणालाही द्या मात्र तालुकाध्यक्ष निवडीबाबत आ रोहित पवार यांनी तालुक्यातील जेष्ठ  पक्षनिष्ठ, एकनिष्ठ तसेच सतत सक्रिय असलेले कार्यकर्ते यांचंही मत व प्रतिक्रिया ऐकून घ्यायला पाहिजे. निवड प्रक्रियेत विचारात घ्यायला पाहिजे अशी अपेक्षा पदाधिकारी व कार्यकर्ते आपसात बोलतांना दिसत आहेत.

COMMENTS