Homeताज्या बातम्यादेश

भारतावर हमास सारख्या हल्ल्याची धमकी

खलिस्तानी दहशतादी गुरपतवंत सिंह पन्नूची धमकी

नवी दिल्ली ः गाझापट्टीमध्ये इस्त्रायल विरूद्ध पॅलस्टाईन वादामध्ये हमास या दहशतवादी संघटनेने उडी घेत इस्त्रायलवर हल्ला केला होता. त्यातच बुधवारी ख

पुण्यात ऑगस्टपासून भुयारी मेट्रो होणार सुरू
राजधानी दिल्लीने गाठली प्रदूषणाची सर्वोच्च पातळी
लाडक्या बहीण योजनेसाठी चक्क 6 भावांचे अर्ज

नवी दिल्ली ः गाझापट्टीमध्ये इस्त्रायल विरूद्ध पॅलस्टाईन वादामध्ये हमास या दहशतवादी संघटनेने उडी घेत इस्त्रायलवर हल्ला केला होता. त्यातच बुधवारी खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नूनचा एक नवीन व्हिडिओ ऑनलाइन व्हायरल होत असून,  यामध्ये त्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींना इस्रायल-पॅलेस्टाईन युद्धापासून धडा घेण्याची धमकी दिली आहे, अन्यथा भारतावर सुद्धा इस्त्रायलसारखी वेळ येऊ शकते असा इशारा देत त्याने भारतावर हल्ला करण्याची धमकी दिली आहे.
इस्राइल आणि हमास यांच्यात भयंकर युद्ध सुरू आहे. या युद्धात आतापर्यंत 3 हजारहून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान दहशतवादी गुरपतवंत सिंह पन्नू याने भारतावर हमास सारखा हल्ला करण्याची धमकी दिली आहे. गुरपतवंत सिंह पन्नू अमेरिकेने बंदी घातलेल्या शीख फॉर जस्टीस (एसएफजे) संघटनेचा प्रमुख आहे. यासंदर्भात त्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये त्याने, पंतप्रधान मोदी यांनी इस्राइल पॅलेस्टाईन युद्धातून बोध घेतला पाहिजे. कारण अशा प्रकारचा हल्ला भारतावरही होऊ शकतो, असे म्हटले आहे. पंजाबपासून पॅलेस्टाईनपर्यंत अनधिकृतरित्या कब्जा करणारे लोकं प्रतिक्रिया देतात आणि हिंसा हिंसाचाराला जन्म देते. पंजाबवर भारताचा ताबा यापुढेही कायम राहिला तर प्रतिक्रिया द्यावी लागेल आणि यासाठी भारत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी जबाबदार राहतील. तसेच एसएफजे, कॅनडामध्ये झालेल्या आतंकवादी हरदीप सिंह निज्जरच्या हत्येचाही बदला घेतला जाईल, अशी धमकी त्याने दिली आहे. अहमदाबादमध्ये भारत पाकिस्तान वर्ल्ड कप मॅचवरून धमकी देणे आणि संबंध बिघडविण्यासंदर्भात एफआयआर दाखल करण्यात आला होता. अमृतसरमध्ये जन्म झालेल्या पन्नू विरोधात राष्ट्रीय तपास यंत्रणेने 2019 मध्ये पहिला गुन्हा दाखल केला होता. त्याच्यावर दहशदवादी कृत्य आणि ती चालवण्यात प्रमुख भूमिकेसह धमकी आणि पंजाब आणि भारतातील काही भागांमध्ये भीतीदायक वातावरण निर्माण करण्याचे आरोप आहेत. त्यांनतर 3 फेब्रुवारी 2021 मध्ये विशेष राष्ट्रीय तपास न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंटी जारी केले होते. मागच्या वर्षी त्याला 29 नोव्हेंबर मध्ये त्याला घोषित गुन्हेगार म्हणून जाहीर करण्यात आले आहे.

COMMENTS