Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

एस.एस.जी.एम. महाविद्यालयात गांधी विचार संस्कार परीक्षा उत्साहात

कोपरगाव प्रतिनिधी ः रयत शिक्षण संस्थेचे श्री सदगुरू गंगागीर महराज सायन्स, गौतम आर्ट्स अ‍ॅण्ड संजीवनी कॉमर्स महाविद्यालय कोपरगाव येथे शनिवारी गांध

जिद्द आणि कठोर परिश्रम हाच यशाचा मार्ग ः तुपसुंदर
साईबाबांच्या थीम पार्क आणि लेझर शो करीता 40 कोटीचा निधी मंजूर
एकही मृत्यू होऊ देणार नाही : धनंजय मुंडे | सुपरफास्ट महाराष्ट्र | LokNews24 |

कोपरगाव प्रतिनिधी ः रयत शिक्षण संस्थेचे श्री सदगुरू गंगागीर महराज सायन्स, गौतम आर्ट्स अ‍ॅण्ड संजीवनी कॉमर्स महाविद्यालय कोपरगाव येथे शनिवारी गांधी रिसर्च फाउंडेशन, जळगाव यांच्या मार्फत घेण्यात येणारी गांधी विचार संस्कार परीक्षा 2023 मोठ्या उत्साहाच्या वातावरणात पार पडली. सदर परीक्षेला महाविद्यालयातील वरिष्ठ व कनिष्ठ विभागातील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला.
गांधी विचारांचा समृद्ध वारसा पुढच्या पिढीकडे संक्रमित करण्याच्या उद्देशाने स्थापन करण्यात आलेल्या गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या माध्यमातून अनेक उपक्रम राबविण्यात येत आहे. एक संवेदनशील व राष्ट्रप्रेमी जागरुक व्यक्ती निर्माणाच्या कार्याचा पाया गांधी विचारांवर आधारित असून शालेय विद्यार्थ्यांसह तरुण पिढीसाठी 2007 पासून घेण्यात येणार्‍या गांधी विचार संस्कार परीक्षेला (जीव्हीएसपी) मिळणारा प्रतिसाद उत्साहवर्धक व उपक्रमाची आवश्यकता अधोरेखित करणारा आहे. व्यक्ती निर्माणाद्वारे समाज परिवर्तनासोबत राष्ट्र उभारणीचे हे कार्य असून गेल्या 16 वर्षात भारतातील व अन्य देशांतील 21 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी, शिक्षकांनी व हजारो कैद्यांनी या परीक्षेद्वारे गांधी विचार समजून घेण्याचा प्रयत्न केला असुन त्याच अनुषंगाने कोपरगाव येथील एस एस जी एम महाविद्यालयात महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य डॉ. आर. आर. सानप व ज्युनिअर विभागाचे उपप्राचार्य प्रा. शिंदे एस.एस. यांचे मार्गदर्शनाखाली अतिशय उत्तमरित्या परीक्षा संपन्न झाली. सदर परीक्षा यशस्वीतेसाठी कर्मवीर विद्याप्रबोधिनीचे चेअरमन प्रा. हाडुळे एस. पी., सदस्य डॉ. श्रीम. सुपेकर व्ही. पी., प्रा. शेळके के. जे., प्रा. चंदनशिवे ए. एस., प्रा. बारहाते व्ही. एल., प्रा. बिरारी एन. टी. तसेच ज्युनिअर कला विभाग प्रमुख डॉ. काळे एस. पी., वाणिज्य विभाग प्रमुख प्रा. वाघ बी. एम., विज्ञान विभाग प्रमुख प्रा. पाटील के.एस., प्रा. जाधव एच.एस., प्रा. सौ. शेंडगे जे. बी., प्रा. श्रीम. भुते ए. वाय., प्रा. तुरकणे के. व्ही., प्रा. श्रीम. गायकवाड एम. व्ही., प्रा. श्रीम. वर्पे पी.एन., तसेच कार्यालयीन अधीक्षक  सुनील गोसावी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

COMMENTS