Homeताज्या बातम्यादेश

मोहम्मद फैजल यांना दुसर्‍यांदा खासदारकी बहाल

नवी दिल्ली/प्रतिनिधी ः राष्ट्रवादी काँगे्रसचे लक्षद्वीपचे खासदार मोहम्मद फैजल यांना लोकसभेतून दुसर्‍यांदा अपात्र ठरवण्यात आले होते. मात्र शरद पवा

भाजपकडून ठाकरेंना अप्रत्यक्षपणे युतीची ऑफर
मराठा आरक्षणासाठी मूक मोर्चाची हाक; महाराष्ट्र पेटवू शकतो, पण आमची संयमाची भूमिका – संभाजीराजे
अखेर कुस्ती महासंघाचे निलंबन  

नवी दिल्ली/प्रतिनिधी ः राष्ट्रवादी काँगे्रसचे लक्षद्वीपचे खासदार मोहम्मद फैजल यांना लोकसभेतून दुसर्‍यांदा अपात्र ठरवण्यात आले होते. मात्र शरद पवार गटाच्या या खासदाराला सर्वोच्च न्यायालयाने दिलासा देत, त्यांच्या शिक्षेच्या निर्णयाला स्थगिती दिल्यामुळे त्यांना दुसर्‍यांदा खासदारकी बहाल करण्यात आली आहे.
2009 साली केरळ उच्च न्यायालयाने मोहम्मद फैजल यांच्याविरोधात हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा नोंदवण्यात आला होता. त्यांना या आरोपाखाली 10 वर्षांची शिक्षा देखील सुनावण्यात आली होती. या शिक्षेच्या निर्णयाला स्थगिती मिळावी यासाठी त्यांनी केरळ उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, केरळ उच्च न्यायालयाने त्यांच्या शिक्षेच्या निर्णयाला स्थगिती दिली नाही. ज्यामुळे लोकसभेने त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई केली. त्यानंतर त्यांनी सर्वोच्च न्यायालयात शिक्षेला स्थगिती मिळावी यासाठी दाद मागितली.ज्यानंतर सुप्रीम कोर्टाने त्यांना खासदारकी पुन्हा बहाल केली.

COMMENTS