Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

दिव्यांगांच्या रखडलेल्या मानधनासाठी उपोषण : नय्युमभाई सुभेदार

जामखेड/प्रतिनिधी ः जामखेड तालुक्यातील दिव्यांग व विधवा, ज्येष्ठ नागरिक यांचे गेली तीन महिन्यापासून रखडलेले मानधन मिळत नाही प्रशासन दखल घेत नसल्या

मोटारसायकल चोरणारी टोळी गजाआड
करंजीत सुरू होणार घरोघरी आरोग्य तपासणी- उपसरपंच आगवन
कोपरगाव-रोटेगाव रेल्वे लाईनच्या प्रस्तावास मंजुरी द्या

जामखेड/प्रतिनिधी ः जामखेड तालुक्यातील दिव्यांग व विधवा, ज्येष्ठ नागरिक यांचे गेली तीन महिन्यापासून रखडलेले मानधन मिळत नाही प्रशासन दखल घेत नसल्याने 16 ऑक्टोबर रोजी तालुक्यातील सर्व दिव्यांगांना घेऊन उपोषणाला बसणार असल्याचा इशारा प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष नय्युमभाई सुभेदार यांनी दिला आहे. संजय गांधीसह विविध योजनेतला या लाभार्थ्यांना लाभ मिळत नसल्याने शेकडो लाभार्थ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे.
जामखेड नगर परिषदेमार्फत दिव्यांगाचा पाच टक्के निधी न मिळाल्यास 20 ऑक्टोबरपासून जामखेड नगर परिषदेसमोर उपोषण करण्याचा इशारा जामखेड तालुका प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने देण्यात देण्यात आला असून याबाबतचे निवेदन तहसीलदार योगेश चंद्रे व जामखेड नगर परिषदेचे अजय साळवे यांना देण्यात आले आहे.यावेळी जामखेड तालुका प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष नय्युम भाई सुभेदार, जामखेड शहराध्यक्ष दिनेश राळेभात, जवळा गट अध्यक्ष राहुल भालेराव, दिव्यांग सेल अध्यक्ष सचिन उगले, संजय मोरे, सोहेल तांबोळी, सचिन जाधव, सुरज खैरे, काकासाहेब शिंदे, सरफराज तांबोळी, अशोक वस्तरे, एकनाथ उगले, आशा चौगुले, सुशीला चव्हाण, सुनिता शेगर अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. तरी प्रशासनाने दखल घेऊन गोरगरीब विधवा, निराधार, जेष्ठ नागरिक व दिव्यांगांच्या मानधनाचा प्रश्‍न मार्गी लावावा व सहकार्य करावे असे आवाहन यावेळी करण्यात आले.

COMMENTS