अहमदनगर ः शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथील प्रा. अर्जुन नामदेव गायकवाड यांनी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल त्यांचा लातूर येथे एक ऑक्ट
अहमदनगर ः शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथील प्रा. अर्जुन नामदेव गायकवाड यांनी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल त्यांचा लातूर येथे एक ऑक्टोंबर 2023 रोजी महाराष्ट्र गौरव पुरस्कार देऊन यथोचित सन्मान करण्यात आला.
इंडियन टॅलेंट सर्चच्या वतीने दिल्या जाणार्या पुरस्काराचे वितरण मा,मंत्री संजय बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली व मराठवाडा शिक्षक महासंघाचे आमदार विक्रम काळे इंडियन टॅलेंटचे संचालक दत्तात्रय मट्टेवाड यांच्या उपस्थितीत पुरस्कार प्रदान करण्यात आला, प्रा.अर्जुन गायकवाड यांनी बोधेगाव येथील श्री शिवाजी हायस्कूल या ठिकाणी दहा वर्षे तर महात्मा गांधी विद्यालय येळी ता,पाथर्डी येथे एक वर्षे असे अकरा वर्षाच्या अध्यापनात त्यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकास केला, 2016- 17 मध्ये राळेगण सिध्दी येथे पर्यावरण संमेलनात सक्रिय सहभाग नोंदवला तसेच अनेक सांस्कृतिक कार्यक्रम राबवून विद्यार्थ्यांना घडवले. त्यामुळे त्यांचे ह. भ. प रामगिरी महाराज, मुख्याध्यापक उत्तम खांडवी, साहित्यिक विठ्ठल बरसमवाड ,प्राचार्य बालाजी गायकवाड तसेच महेश कुमार शिरसाट,आदिनाथ शिदोरे, सिकंदर शेख, पोपट शेलार,म्हस्के जयराम, राम कराड,जगन्नाथ कराड,भुजंग कराड मुख्या.अनिल कराड प्रा.शिवाजी दळे यांनी अभिनंदन केले असून पंचक्रोशीतून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
COMMENTS