Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

गौतमी पाटीलचे सिंधुदुर्गमधील कार्यक्रम रद्द

सिंधुदुर्ग प्रतिनिधी - नृत्यांगना गौतमी पाटील नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. कोल्हापूरनंतर आता सिंधुदुर्गातही गौतमीला नो एन्ट्

एमएचटी-सीईटी परीक्षेतील गुणवंतांचा दयानंद शिक्षण संस्थेतर्फे सत्कार
शेतकर्‍यांच्या उत्पादनाचा आर्थिक फायदा व्यापार्‍यांनाच
हिंगोलीत आरक्षणासाठी तरुणाची आत्महत्या

सिंधुदुर्ग प्रतिनिधी – नृत्यांगना गौतमी पाटील नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. कोल्हापूरनंतर आता सिंधुदुर्गातही गौतमीला नो एन्ट्री आहे. सिंधुदुर्गातील कुडाळ आणि कणकवलीमध्ये गौतमीच्या डीजे डान्स शो आयोजित करण्यात आला होता. मात्र अनेकांनी या कार्यक्रमाला विरोध दर्शवल्यानंतर आयोजकांनी तांत्रिक कारण देत कार्यक्रम रद्द केला. 7 आणि 8 ऑक्टोबरला कुडाळ आणि कणकवलीमध्ये गौतमी पाटीलचा डीजे डान्स शो होता आयोजित करण्यात आला होता. 8 ऑक्टोबरला कुडाळ येथील मराठा समाज हॉल येथे मराठा समाज हॉल येथे सकाळी 11 वाजता आणि कणकवली येथील वसंतराव आचरेकर प्रतिष्ठाण येथे सायंकाळी पाच वाजता ‘गौतमी पाटील डीजे डान्स शो’ या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. पण काही तांत्रिक कारणांमुळे हा कार्यक्रम रद्द करण्यात आल्याचं समोर आलं आहे. गौतमीचा कार्यक्रम जरी रद्द झाला तरी 7 ऑक्टोबर 2023 रोजी आयोजित करण्यात आलेला ‘कॉमेडीचे सुपरस्टार’ हा कार्यक्रम मात्र पार पडणार आहे. छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम ‘चला हवा येऊ द्या’तील कलाकार हा कार्यक्रम करणार आहेत. या कार्यक्रमाच्या तिकीट विक्रीला सुरुवात झाली आहे. देवगड अम्युझमेंट सेंटरचे धैर्यशील पाटील यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे.

COMMENTS