Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

प्रीतिसुधाजी स्कूलचा संस्कार फेस्टीवल ठरतोय आदर्श

राहाता/प्रतिनिधी ः शिक्षणाचे माध्यम भलेही इंग्रजी असले तरीही भारतीय संस्कृतीने परिपूर्ण असलेल्या राहाता येथील प्रीतिसुधाजी शैक्षणिक संकुलात सध्या

आ. राणेंचे नगर लक्ष ठरणार…विखे-जगतापांना अडचणीचे?
Sangamner : वाळू तस्कराने घेतला चिमुकल्याचा जीव | LOKNews24
30 एप्रिलपर्यंत सरसकट संपूर्ण बाजारपेठा बंद ठेवण्याचा निर्णय

राहाता/प्रतिनिधी ः शिक्षणाचे माध्यम भलेही इंग्रजी असले तरीही भारतीय संस्कृतीने परिपूर्ण असलेल्या राहाता येथील प्रीतिसुधाजी शैक्षणिक संकुलात सध्या संस्कार फेस्टिवल सुरू आहे. प्राचार्य डांगे पॅटर्नचे प्रणेते इंद्रभान डांगे हे गेल्या पन्नास वर्षांपासून शैक्षणिक क्षेत्रात नवनवीन प्रयोग करत आहेत.त्यांच्याच प्रयोगांतून साकारलेला संस्कार फेस्टिवल हा राज्यभरातील शाळांसाठी दिशादर्शक ठरत आहे.
प्रीतिसुधाजी शैक्षणिक संकुलातील या आगळ्या वेगळ्या सोहळ्याचे उद्घाटन नुकतेच संस्थापक अध्यक्ष इंद्रभान डांगे, डॉ. पांडुरंग गुंजाळ, डॉ. एम. वाय. देशमुख, उपाध्यक्षा स्नेहलता डांगे, भगवानराव डांगे, प्राचार्य ज्ञानेश डांगे, पूनम डांगे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. साने गुरुजी यांच्या श्यामची आई या आदर्श मूल्यांची शिकवण देणार्‍या पुस्तकाचे पारायण सध्या प्रीतिसुधाजी स्कूलचे जवळपास पंधराशे विद्यार्थी एकाच वेळेस करत आहेत. अवघ्या महाराष्ट्राला संस्कार शिदोरी देऊन अनेकांच्या जीवनात बदल घडवणारे हे पुस्तक या संकुलातील बाल गोपाळ आनंदाने वाचत आहेत त्यामुळे वाचन संस्कृतीतही वाढ होत आहे. नुकत्याच झालेल्या गणेश उत्सव काळात या संकुलातील सर्वच बालकांनी सर्व देवतांच्या आरत्या व संस्कृत श्‍लोक मुखोदगत केले आहेत. संस्कारशिल शेकडो गीतांचा संग्रह असलेले प्रीतिपुष्प नावाचे पुस्तक खास बालकांनी संस्कारांचे धडे गिरावेत या साठी स्कूलने प्रकाशित करून घेतले आहे. बालकांमध्ये शिक्षणासोबतच संस्काराची रुजवणुक व्हावी यासाठी प्रीति सुधाजी गुरुकुल लाखो रुपये खर्चून नुकताच कीर्तन महोत्सव ही बालकांसाठी आयोजित केला होता. प्रीतिसुधाजी शैक्षणिक संकुलात सुरू असलेल्या संस्कार फेस्टिव्हल विषयी अधिक माहिती देताना प्राचार्य ज्ञानेश डांगे यांनी सांगितले की, श्रावण महिन्यापासून संस्कार फेस्टिव्हलची सुरुवात झाली आहे. विज्ञान युगातील मोबाईलच्या अतिवापराने बालकांच्या मनावर वाईट परिणाम होत आहे. यामुळेच शाळेत शिक्षणासोबतच संस्कारांची मुद्दामहून रुजवणूक करणे अत्यावश्यक बाब बनली आहे. श्यामची आई व त्यांसारखीच इतर संस्कारक्षम पुस्तके वाचन, थोरांच्या विचारांचे श्रवण, कीर्तन महोत्सव, दररोज पहाटे हरिपाठ व गौळणी यांचे पावलीसोबत सादरीकरण, मनाचे श्‍लोक, हनुमान चालीसा आदी गोष्टी या महोत्सवात घेतल्या जात आहेत. दिवाळीपर्यंत चालणार्‍या या संस्कार फेस्टीव्हलमधून नष्ट होत चाललेल्या संस्कार मूल्यांचे व सदाचाराचे शिक्षण दिले जात असल्याने बालक, पालक व परिसरातून आनंद व्यक्त केला जात आहे.

COMMENTS