मुख्याधिकारी सरोदे यांची अखेर बदली

Homeमहाराष्ट्रअहमदनगर

मुख्याधिकारी सरोदे यांची अखेर बदली

कोपरगाव शहर प्रतिनिधी- कोपरगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांची अखेर बदली.

राहुरीत 11 सरपंचांसाठी 88 उमेदवारांचे गुडघ्याला बाशिंग !
कोपरगावमध्ये दोन वर्षानंतर फुलणार ‘गोदाकाठ महोत्सव’
कोपरगाव शहरात श्री साई सच्चरित्र पारायण सोहळ्याचे आयोजन

कोपरगाव शहर प्रतिनिधी- कोपरगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांची अखेर बदली.

गेल्या कित्येक दिवसापासून बदली होणार की नाही अशी चर्चा शहराच्या कट्ट्यावर सुरू असतानाच कोपरगाव मनसेच्या वतीने आमदार आशुतोष काळे व प्रांताधिकारी गोविंद शिंदे यांना निवेदन देऊन विनंती करण्यात आली होती की मुख्याधिकारी सरोदे यांनी शहरात कोरोना च्या काळात उत्कृष्टपणे काम केले असून त्यांची बदली न करता त्यांचा कार्यकाल वाढवून मिळावा.
 परंतु शुक्रवार दिनांक १८ जून २०२१ रोजी सचिन सहस्त्रबुद्धे अवर सचिव महाराष्ट्र शासन यांच्या आदेशान्वये कोपरगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारी  प्रशांत वसंत सरोदे यांची जळगाव जिल्ह्यातील अमळनेर नगरपालिकेच्या मुख्याधिकारी पदी बदली करण्यात आली आहे

COMMENTS