Homeताज्या बातम्यादेश

देशभरात राबवले स्वच्छता सेवा अभियान

पंतप्रधान मोदींनी कुस्तीपटू अंकित बैयनपुरियासोबत केले श्रमदान

नवी दिल्ली/प्रतिनिधी ः महात्मा गांधींच्या 154 व्या जंयतीच्या एक दिवस आधी म्हणजेच रविवारी देशभरात स्वच्छता ही सेवा अभियान राबविण्यात आले. या अभिया

डॉक्टर्स डे निमित्ताने सावळेश्वर येथे आरोग्य शिबीराचे आयोजन
ढिगार्‍याखालील जीव वाचविण्याला सर्वोच्च प्राधान्य
पालघरमध्ये दहावीतील विद्यार्थ्यांची अमानुष रॅगिंग

नवी दिल्ली/प्रतिनिधी ः महात्मा गांधींच्या 154 व्या जंयतीच्या एक दिवस आधी म्हणजेच रविवारी देशभरात स्वच्छता ही सेवा अभियान राबविण्यात आले. या अभियानाअंतर्गत लाखो लोकांनी श्रमदान केले. या उपक्रमाअंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कुस्तीपटू अंकित बैयनपुरियासोबत श्रमदान करत एक अनोखा संदेत दिला.
यासंदर्भात पंतप्रधान मोदींनी सोशल मीडियावर अंकित बैयनपुरिया सोबतचा 4 मिनिटे 41 सेकंदांचा व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये ते स्वच्छ आणि निरोगी भारताचा संदेश देत आहेत. सप्टेंबरच्या मन की बात कार्यक्रमात पंतप्रधान मोदींनी 1 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजल्यापासून एक तास स्वच्छतेसाठी श्रमदान करण्याचे आवाहन केले होते. या श्रमदानासाठी पंतप्रधानांनी एक तारीख, एक तास, एक साथ असा नारा दिला होता. आजच्या मोहिमेसाठी देशभरातील 6.4 लाख ठिकाणांची निवड करण्यात आली. भाजप अध्यक्ष जेपी नड्डा, गृहमंत्री अमित शहा यांच्यासह अनेक बड्या नेत्यांनी वेगवेगळ्या राज्यात झाडू मारून स्वच्छतेचा संदेश दिला.

स्वस्थ व स्वच्छ भारतासाठीची मोहीम – पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटले आहे की, आज, जेव्हा देश स्वच्छतेवर लक्ष केंद्रित करत आहे, तेव्हा अंकित बैयनपुरिया आणि मी सुद्धा यात सहभागी होत आहोत. फक्त स्वच्छतेच्या पलीकडे, आम्ही शारीरिक व मानसिक तंदरुस्तीला सुद्धा यात महत्त्वाचे स्थान देत आहोत. ही स्वस्थ व स्वच्छ भारतासाठीची मोहीम आहे. व्हिडीओमध्ये आपण पाहू शकता, मोदी अंकितला स्वच्छता मिशनमुळे त्याच्या फिटनेसला कशी मदत झाली, असे विचारतात. त्यावर अंकित उत्तर देतो, आपला परिसर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी आपली आहे. जर आपल्या सभोवतालचा परिसर स्वच्छ राहिला तरच आपण तंदुरुस्त राहू. सोनीपतच्या लोकांनी स्वच्छतेवर लक्ष केंद्रित करायला सुरुवात केली आहे, असेही अंकित म्हणाला.

COMMENTS