इस्लामाबाद/वृत्तसंस्था ः पाकिस्तानमधील बलूचिस्तानमध्ये एका मशिदीजवळ बॉम्बस्फोट झाला आहे. या आत्मघाती हल्ल्यात 34 लोकांचा मृत्यू झाला आहे, तर 130
इस्लामाबाद/वृत्तसंस्था ः पाकिस्तानमधील बलूचिस्तानमध्ये एका मशिदीजवळ बॉम्बस्फोट झाला आहे. या आत्मघाती हल्ल्यात 34 लोकांचा मृत्यू झाला आहे, तर 130 हून अधिक नागरिक जखमी झाले आहेत. मृतांमध्ये एका पोलीस कर्मचार्याचाही समावेश आहे.
ही घटना शुक्रवारी सकाळी मस्तुंग जिल्ह्यात झाली. लोक ईद मिलाद उन नबीनिमित्त नमाज पठण करण्यासाठी मशिदीत जमले असताना हा बॉम्पस्फोट झाला.असिस्टंट कमिश्नर अताउल्लाह मुनीम यांनी सांगितलं की, घटनास्थली लोकांची गर्दी असल्याने या बॉम्बस्फोट मृतांचा आकडा वाढला आहे. या हल्ल्याची जबाबदारी अजूनपर्यंत कोणत्याही दहशतवादी संघटनेने घेतलेली नाही. याच जिल्ह्यात महिन्याच्या सुरुवातीला बॉम्बस्फोट झाला होता त्यामध्ये 11 लोक जखमी झाले होते. पोलिसांनी सांगितले की, आजच्या हल्ल्यात जवळपास 130 नागरिक जखमी झाले आहेत. घटनास्थळी मृतदेहांचा व जखमी व्यक्तींचा खच पडल्याचे दिसून येत आहे.
COMMENTS