Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नगरपालिकेच्या आवारात महापुरुषाचे पुतळे बसवावे ः वहाडणे

कोपरगाव प्रतिनिधी ः कोपरगाव शहरात छत्रपती श्री.शिवाजी महाराज, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज,विश्‍वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर डॉ.अण्णाभाऊ

विखे यांना मंत्रिपद मिळताच पाथर्डीत जल्लोष
25 गोशाळेसाठी वर्धमान संस्कार धामकडून 25 लाखांची देणगी
नगरला पाणी येईल हो .. पण, फेज टू विलंबाचे काय ? l Lok News24

कोपरगाव प्रतिनिधी ः कोपरगाव शहरात छत्रपती श्री.शिवाजी महाराज, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज,विश्‍वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर डॉ.अण्णाभाऊ साठे यांचे पूर्णाकृती पुतळे उभारलेले आहेत. मात्र आधी असलेले त्याच महापुरुषांचे अर्धाकृती पुतळेही तसेच आहेत. त्यामुळे सदर अर्धाकृती पुतळे तसेच महात्मा गांधीजी, महात्मा ज्योतीबा फुले, पुण्यश्‍लोक अहिल्याबाई होळकर राजर्षी श्री.शाहू महाराज स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांचे पुतळे तयार करत ते कोपरगाव नगरपरिषदेच्या नव्याने होत असलेल्या प्रशासकीय इमारतीच्या आवारात बसविण्यात यावे अशी मागणी माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.
 या पत्रकात वहाडणे यांनी म्हटले आहे की, कार्यालयाच्या नूतन इमारतीचे काम प्रगतीपथावर आहे.ही इमारत पूर्णत्वास गेल्यानंतर या इमारतीच्या आवारात हे पुतळे सन्मानपूर्वक प्रस्थापित करण्यात यावेत, तशी मागणी यापूर्वीही काही संघटनांनी केलेलीच आहे. त्यामुळे नगरपरिषदेच्या आवारात एकाच ठिकाणी हे सर्व पुतळे बसविल्यास सदरच्या पुतळ्यांची दैनंदिन स्वच्छता व पूजनही होईल. पुतळे सुरक्षितही राहतील.नगरपरिषदेचे नगराध्यक्ष नगरसेवक, अधिकारी-कर्मचारी व नागरिक यांना नित्यनेमाने या महापुरुषांचे दर्शनही होईल.अशी मागणी वहाडणे यांनी पत्रकाद्वारे केली आहे.

COMMENTS