मुंबई प्रतिनिधी - अभिनेत्री स्वरा भास्करच्या घरी चिमुकलीचं आगमन झालं आहे. स्वरा भास्कर आणि फहाद अहमद आई-वडील झाले आहेत. स्वरा भास्करने सोशल म
मुंबई प्रतिनिधी – अभिनेत्री स्वरा भास्करच्या घरी चिमुकलीचं आगमन झालं आहे. स्वरा भास्कर आणि फहाद अहमद आई-वडील झाले आहेत. स्वरा भास्करने सोशल मीडियावर पोस्ट करत लेक झाल्याचे सांगितलं आहे. तसेच तिचे नाव देखील जाहीर केले आहे. स्वरा भास्करने इंस्टाग्रामवर पोस्ट करत मुलगी झाल्याची आनंदाची बातमी शेअर केली आहे. स्वराने फहादसोबत पोस्ट शेअर करत तिघांचा सुंदर फोटो शेअर केला आहे.स्वरा भास्करने नवरा आणि मुलीसोबतच काही फोटो शेअर करत लिहिले आहे की, ‘मी मनापासून प्रार्थना केली, देवाने अशिरावढी दिला, एक गाणे गुणगुणले, एक गूढ सत्य… आमची मुलगी ‘राबिया’चा जन्म 23 सप्टेंबर 2023 रोजी झाला. कृतज्ञ आणि आनंदी अंतःकरणाने तुम्ही दिलेल्या प्रेमासाठी खूप आभार! हे संपूर्ण नवीन जग आहे.’ अभिनेत्री गौहर खानने स्वराच्या पोस्टवर कमेंट करत तिचे अभिनंदन केला आहे. तसेच बाळाला आशीर्वाद दिला आहे. नीना गुप्ता, मिनी माथूर, दिव्या दत्ता, कोंकना सेनशर्मा, सुमीत व्यास, सयानी गुप्तासह अनेकांनी स्वराचे अभिनंदन केले आहे. अभिनेत्री गौहर खानने स्वराच्या पोस्टवर कमेंट करत तिचे अभिनंदन केला आहे. तसेच बाळाला आशीर्वाद दिला आहे. नीना गुप्ता, मिनी माथूर, दिव्या दत्ता, कोंकना सेनशर्मा, सुमीत व्यास, सयानी गुप्तासह अनेकांनी स्वराचे अभिनंदन केले आहे.
COMMENTS