नाशिक : सध्या लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांमध्ये सांधेदुखी ही एक समस्या प्रामुख्याने पाहायला मिळते आहे ती समस्या बहुतेक वेळा वय वर्ष ४० न
नाशिक : सध्या लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांमध्ये सांधेदुखी ही एक समस्या प्रामुख्याने पाहायला मिळते आहे ती समस्या बहुतेक वेळा वय वर्ष ४० नंतर सुरु होत असते परंतु हल्ली बदललेली आहार पद्धती आणि बदललेली जीवनशैली यामुळे प्रत्येक जण कामांमध्ये व्यस्त असतो. बहुतेक वेळा आपण कधीही कोणत्याही प्रकारचा आहार सेवन करतो आणि अनेक वेळा आपल्या शरीराला आवश्यक ती पोषक तत्व सुद्धा प्राप्त होत नाही आणि म्हणूनच शरीरामध्ये अनेकदा कॅल्शियमची कमतरता निर्माण होते परंतु ही कॅल्शियमची कमतरता भविष्यात धोक्याची घंटा तर ठरणार नाही ना याची काळजी प्रत्येकाने घ्यायला पाहिजे असे प्रतिपादन नारायणी हॉस्पीटलचे सांधेबदल तज्ञ डॉ. मनिष चोकसी यांनी केले.
एकता ज्येष्ठ नागरिक संघातर्फे आयोजित व्याख्यान कार्यक्रमात डॉ. चोकसी बोलत होते. यावेळी व्यासपीठावर संघाचे अध्यक्ष प्रतापराव वाढणे, सचिव सुधाकर भोई, लोकज्योती मंचचे खजिनदार जितेंद्र येवले उपस्थित होते.
डॉ. मनिष चोकसी म्हणाले की, शरीरातील विटामिन, मिनरल्स आणि आवश्यक ते पोषक घटकांची नियमितपणे तपासणी करायला हवी. पोषक तत्व कमी झाल्याने मान दुखी, गुडघे दुखी ,कंबर दुखी यासारख्या वेदना त्रास देतात ह्या समस्या प्रत्येकाच्या शरीरानुसार वेगळे कारण सुद्धा तितकेच कारणीभूत ठरतात. ज्येष्ठांसाठी आपल्या आनंदी जीवन जगण्यासाठी प्रयत्नशील रहायला हवे. स्वत:साठी वेळ द्यायला हवा तसेच ज्या गोष्टीत आनंद मिळेल त्या गोष्टींमध्ये रममाण व्हायला हवे असेही त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी मोठ्या संख्येने ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.
COMMENTS