पुणे/प्रतिनिधी ः उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी चांगलेच ओळखले जातात. शिवाय मुंबईमध्ये केंद्रीय गृहमंत्री दाखल झाल्यानंतर त्यां
पुणे/प्रतिनिधी ः उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी चांगलेच ओळखले जातात. शिवाय मुंबईमध्ये केंद्रीय गृहमंत्री दाखल झाल्यानंतर त्यांच्यासोबत झालेल्या चर्चेमध्ये अजित पवार नसल्यामुळे तिन्ही पक्षात सर्व काही आलबेल नसल्याची चर्चा असतांना, आज माझ्याकडे अर्थखाते आहे. त्यामुळे आपल्याला झुकते माप मिळते. पण, यापुढे अर्थखाते टिकेल की नाही टिकेल, सांगता येत नाही, असे अजित पवार यांनी म्हटल्याने राजकीय वर्तुळात चर्चांनी जोर धरला आहे. बारामती तालुका सहकारी दूध संघाच्या पदाधिकार्यांची बैठकीत उपमुख्यमंत्री पवार बोलत होते.
यावेळी बोलतांना पवार पुढे म्हणाले की, बारामतीत 42 कोटी रूपये खर्च करून क्रीडा संकुलाचे काम सुरू झाले आहे. त्यासाठी मार्केट कमिटीला 5 कोटी रूपये देऊन जागा घेण्यात आली आहे. म्हणजे मार्केटला जागा देताना मी फुकट देतो, पण त्यांची जागा घेताना 5 कोटी दिले, अशी मिश्कील टिप्पणी पवार यांनी केली. उद्धव ठाकरेंबरोबर उपमुख्यमंत्री असतांना अनेक योजनांच्या फाइल्स आमच्यापुढं यायच्या. त्यात बघायचे कुठल्या, कुठल्या गावांची नावे आहेत. मग, बारामतीचे नाव नसेल, तर टाकायचे आणि सही करायची. अशा पद्धतीने आपल्याला 42 कोटी रूपयांचे मॅग्नेटचे काम मिळाले, असा किस्सा अजित पवार यांनी सांगितला. टोरंटो सीएनजी गॅस एजन्सी देत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर लगेच खरेदी विक्री संघासाठी टोरंटो गॅस एजन्सी घेतली. शेवटी आपल्या संस्था ताकदवान आणि आर्थिक सक्षम झाल्या पाहिजेत. आज माझ्याकडे अर्थखात आहे. त्यामुळे आपल्याला झुकते माप मिळते. पण, पुढे टिकेल, नाही टिकेल, सांगता येत नाही. मात्र, खरेदी विक्री संघ, दूध संघ, बारामती बँक, माळेगाव, सोमेश्वर आणि छत्रपती कारखाना हे पण ताकदीचे झाले पाहिजेत. तिथे चूका होत असतील, तर दुरूस्त केल्या पाहिजेत, असा सज्जड दमही अजित पवार यांनी भरला आहे. शरद पवार गटाने विधानसभा अध्यक्षांकडे तक्रार केली आहे. त्यांनी अजित पवार गटातील आमदारांना अपात्र ठरवण्याची मागणी केली आहे. त्यावर बोलताना अजित पवार म्हणाले की, प्रत्येकाला तक्रार करण्याचा आणि न्याय मागण्याचा अधिकार आहे. कायद्याच्या नियमांच्या चौकटीत बसवून त्यावर निर्णय देतील, असेही पवार यावेळी म्हणाले.
अजित पवारांना भाजपकडून डावलण्याचा प्रयत्न ः खडसे – गेल्या अनेक दिवसांपासून अजित पवारांना डावलले जात आहे, अशी भावना त्यांच्या मनात दिसत आहे, अशी प्रतिक्रिया एकनाथ खडसे यांनी दिली. ते माध्यमांशी बोलत होते. अजित पवारांच्या नाराजीवर खडसे म्हणाले, अजित पवार महायुतीत राहिले की नाही राहिले, हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. पण गेल्या अनेक दिवसांपासून अजित पवारांना डावलले जात आहे, अशी भावना त्यांच्या मनात दिसत आहे. त्यामुळे त्यांनी नाराजीची भावना व्यक्त केली असावी.
COMMENTS