Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नागपुरातील पूरग्रस्तांना मिळणार तातडीची मदत

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केली पूरग्रस्त भागांची पाहणी

नागपूर/प्रतिनिधी ः नागपूरमध्ये अवघ्या 4 तासात झालेल्या मुसळधार पावसाने आणि त्यातही केवळ 2 तासात 90 मि.मी. पाऊस झाल्याने अंबाझरी तलाव ओव्हरफ्लो झा

पाण्याचे आणि पथदिव्यांची थकित देयके अदा करण्यासाठीचा प्रस्ताव सादर करावा – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठ्यासाठी ८ हजार मेगावॅट वीजनिर्मिती निश्चित
शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठ्यासाठी ८ हजार मेगावॅट वीजनिर्मिती निश्चित

नागपूर/प्रतिनिधी ः नागपूरमध्ये अवघ्या 4 तासात झालेल्या मुसळधार पावसाने आणि त्यातही केवळ 2 तासात 90 मि.मी. पाऊस झाल्याने अंबाझरी तलाव ओव्हरफ्लो झाला आणि नागनदी, पिवळी नदी लगतचा परिसरात पाणी शिरले. यामुळे तब्बल 10 हजार घरांमध्ये पाणी शिरले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी पूरग्रस्तांची पाहणी केली. यावेळी त्यांनी नागपूर पूरग्रस्तांना प्रत्येकी 10 हजार रुपये तातडीची मदत देण्यात येईल, दुकानांच्या क्षतीसाठी 50 हजारांपर्यंत मदत, टपरीधारकांना 10 हजारापर्यंत मदत, तर गाळ काढण्यासाठी राज्य सरकार निधी देण्यात येणार आहे.
दरम्यानफडणवीस यांनी शहरातील अंबाझरी परिसरात पूरामुळे झालेल्या नुकसाणीची पाहणी केली. नागपूरात ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने पूर आला होता. या पावसात नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या वेळी नागरिकांनी फडणवीसांसमोर आपल्या व्यस्था मांडल्या. फडणवीसांनी आपल्या घराची पाहणी करावी, अशी अपेक्षा नागरिक या वेळी व्यक्त करत होते. कालच्या मुसळधार पावसामुळे उद्भवलेल्या स्थितीचा आढावा घेण्यासाठीफडणवीस सध्या नागपूरमध्ये दाखल झाले आहेत. त्यांनी कालच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या सोबत नागपूर महानगरपालिकेत एका बैठकीतून आढावा घेतला होता. या वेळी त्यांनी नागपूर पूरग्रस्तांना प्रत्येकी 10 हजार रुपये तातडीची मदत देण्यात येईल, दुकानांच्या क्षतीसाठी 50 हजारांपर्यंत मदत, टपरीधारकांना 10 हजारापर्यंत मदत, तर गाळ काढण्यासाठी राज्य सरकार निधी देणार असल्याची घोषणा केली होती. नागपुरात झालेल्या पावसामुळे तिघांचा मृत्यू झाला असून, शहराला अजूनही ऑरेंज अलर्ट दिला असल्यामुळे एनडीआरएफ, एसडीआरएफ टीमची तैनाती कायम ठेवण्यात आली आहे.

10 हजार घरांमध्ये शिरले पाणी – नागनदीच्या भिंती पडल्याने नुकसान झाले आहे. लोकांच्या घरात पाणी गेल्याने गाळ आणि चिखलाची परिस्थिती झाली आहे. अनेक लोकांना स्थलांतरीत केले असून, जवळपास 10 हजार घरांमध्ये पाणी शिरले आहे. झोपडपट्टी भागात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. गाळ घरांमध्ये गेल्याने लोकांना अन्नधान्य फेकून द्यावे लागले आहे, असे उपमुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितले.  

COMMENTS