Homeताज्या बातम्यादेश

झारखंडमध्ये धावत्या ट्रेनमध्ये दरोडा

दरोडेखोरांकडून फायरिंग करत लाखोंचा मुद्देमाल लंपास

रांची/वृत्तसंस्था ः झारखंड राज्यात धावत्या रेल्वेमध्ये दरोडा टाकण्यात आल्यामुळे खळबळ उडाली आहे. दरोडेखोरांनी प्रवाशांची लूट करून लाखो रूपयांचा मु

वडगाव गुप्ता येथे युनियन बँक ऑफ इंडियाच्या वतीने जनसुरक्षा अभियान संपन्न
रात्रशाळेबाबत सर्वसमावेशक धोरण तयार करणार – शिक्षणमंत्री दीपक केसरकर
निशिकांत (दादा) स्पोर्टस् फाऊंडेशनतर्फे राज्यस्तरीय नमो चषक हॉकी स्पर्धा

रांची/वृत्तसंस्था ः झारखंड राज्यात धावत्या रेल्वेमध्ये दरोडा टाकण्यात आल्यामुळे खळबळ उडाली आहे. दरोडेखोरांनी प्रवाशांची लूट करून लाखो रूपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना समोर आली आहे. संबलपूर-जम्मू तवी एक्सप्रेसमध्ये ही सर्व घटना घडल्यामुळे खळबळ उडाली आहे.  
घटनेबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, संबलपूर-जम्मू तवी एक्सप्रेसमधील ड-9 बोगीत रात्री 8 ते 10 च्या सुमारास काही दरोडेखोर चढले. रेल्वेमध्ये प्रवेश केल्यानंतर  त्यांनी मोठा गोंधळ घातला. यामुळे नागरिक प्रचंड घाबरले. दरोडेखोरांनी दहशत पसरवण्यासाठी 8-10 वेळा बंदुकीच्या गोळ्या हवेत झाडल्या. भयभीत झालेल्या नागरिकांकडून दरोडेखोरांनी लाखोंची लूट केल्याचा आरोप करण्यात आला आहे. दहशत पसरवत दरोडेखोरांनी प्रवाशांना मारहाण केली. त्यांच्याकडे असलेले सोने, चांदी आणि पैसे असा सर्वच मुद्देमाल लंपास केला. प्रवाशांची लूट केल्यानंतर या दरोडेखोरांनी तेथून पळ काढला. प्रवाशांची लूट केल्यावर मध्येच दरोडेखोरांनी एक्सप्रेस ट्रेनची चेन खेचली आणि तेथून पळ काढला. पुढे डालतेनगंज स्थानकावर ट्रेन पोहचल्यावर प्रवाशांनी मोठा गोंधळ घातला. त्यामुळे ट्रेन दीड ते दोन तास डालतेनगंज स्थानकावर थांबून होती. घटनेची माहिती मिळताच रेल्वे सुरक्षा दल घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जखमी प्रवाशांना मेदिनी राय मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमधील डॉक्टरांकडून उपचार दिले. संतप्त प्रवाशांची समजूत घातली. पोलिसांनी दरोडेखोरांविरोधात तक्रार दाखल केली असून पोलिस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.

COMMENTS