Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत; इंजिनमध्ये बिघाड

मुंबई ः गणपती दोन दिवसांवर आला आहे. त्याआधी रविवार आल्याने नागरिकांची खरेदीसाठी मोठी लगबग सुरु आहे. नागरिकांना अडथळा होऊ नये म्हणून रेल्वेने रविव

काकडे महाविद्यालयाची शैक्षणिक सहल उत्साहात
नाशिक शहरात पहिल्यांदाच ४६ आरोग्य मंदिर चे लोकार्पण :- डॉ भारती पवार 
Shirdi Breaking News : दाम दुप्पटचे आमिष भोवले ! १ कोटी 65 लाखाला चुना लागला

मुंबई ः गणपती दोन दिवसांवर आला आहे. त्याआधी रविवार आल्याने नागरिकांची खरेदीसाठी मोठी लगबग सुरु आहे. नागरिकांना अडथळा होऊ नये म्हणून रेल्वेने रविवारचा मेगाब्लॉकही रद्द केला. मात्र तरीही नागरिकांना मनस्तापाला सामोरे जावे लागले आहे. अंबरनाथ आणि बदलापूर दरम्यान मालगाडीच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे. त्यामुळे कर्जतहून मुंबईच्या दिशेने जाणार्‍या लोकल वाहतुकीवर परिणाम झाला आहे. कल्याण लोको शेडमधून इंजिन मागविण्यात आले आहे. पुढील अर्ध्या तासात वाहतूक सुरळीत होण्याची शक्यता आहे.

COMMENTS