Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पोलिसांच्या 2 पेट्रोल पंपावर 20 लाखाची फसवणूक

56 जणांविरोधात चतु:श्रृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

पुणे/प्रतिनिधी ः पुणे ग्रामीण पोलिसांनी पोलिसांसाठी कल्याण योजना अंर्तगत राबवत असलेल्या पाषाण येथील पोलिस अधीक्षक कार्यालय आवारात दोन पेट्रोल पंप

गुंतवणूकीचे आमिष; वृद्धेची पाच लाखांत फसवणूक
ऑनलाइन औषध खरेदी करताना फसवणूक
वर्क फ्रॉम होम’च्या नादात ४६ लाख गमावले

पुणे/प्रतिनिधी ः पुणे ग्रामीण पोलिसांनी पोलिसांसाठी कल्याण योजना अंर्तगत राबवत असलेल्या पाषाण येथील पोलिस अधीक्षक कार्यालय आवारात दोन पेट्रोल पंप सुरु केलेले आहे. सदर ठिकाणी काम करणार्‍या कर्मचार्‍यांकडे जमा झालेले पैसे संबंधित कर्मचार्‍यांनी न भरता तब्बल 20 लाख 19 हजार रुपयांचा गैरव्यवहार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पेट्रोल पंपावर काम करणार्‍या तीन वर्षाचे काळातील 56 जणांवर फसवणूकीचा गुन्हा चतु:श्रृंगी पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आलेला आहे.
याप्रकरणी पुणे ग्रामीण पोलिस दलाच्या मुख्यालयातील पोलिस कल्याण शाखेचे अधिकारी राजेश घायाळ यांनी आरोपी विरोधात चतुश्रृंगी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार सुनिता ननावरे, रेवती, पाटील, आनंता चांदणे, विमला जेम्य, अक्षय जगताप, सुरज पाथरे व इतर 50 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाषाण येथे पुणे ग्रामीण पोलिस दलाचे कल्याण शाखे अंर्तगत दोन पेट्रोल पंप उभारण्यात आलेले आहे. खासगी कंपनी मार्फेत याठिकाणी कर्मचारी भरले जातात. जून 2021 ते मार्च 2023 दरम्यान, पेट्रोल पंपावर पेट्रोल भरल्यानंतर रोखीने पैसे कर्मचारी भरणा करत असतात. मात्र, या कालावधीत सदर कर्मचार्‍यांनी जमा झालेली काही रक्कम ही कंपनीकडे न भरता स्वत:चे आर्थिक फायद्याकरिता वापरली. दरम्यान, पेट्रोल पंपाचे लेखापरिक्षण करण्यात आले. त्यामध्ये लेखा परिक्षक शेख भगरे यांनी अहवाल दिला की, बाणेर रस्त्यावरील पेट्रोल पंपावर दहा लाख 25हजार 324 रुपये तसेच पाषण रोड पेट्रोल पंपावर दोन लाख 93 हजार 736 रुपये असा एकूण 20 लाख 19 हजार रुपयांचा अपहार करुन फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार पोलिसांनी संबंधित एकूण 56 दोषी कर्मचार्‍यांवर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पुढील तपास चतुश्रृंगी पोलिस करत आहे.

COMMENTS