Homeताज्या बातम्यादेश

संसद अधिकारी आणि कर्मचारी दिसणार नव्या ड्रेस कोडमध्ये

नवी दिल्ली प्रतिनिधी - संसदेच्या नव्या इमारतीत कर्मचाऱ्यांना नवा गणवेश मिळणार आहे. महत्त्वाचे असे की, ‘इंडियन टच’ असलेल्या, नवीन गणवेशात ‘नेहर

अनोखा विवाह सोहळा; ‘सेवालया’ मधील एचआयव्ही संक्रमित पाच जोडप्यांचे शुभमंगल सावधान!
ग्रामपंचायत सदस्यावर गावठी कट्ट्यातून झाडल्या चार गोळ्या l पहा LokNews24
अभिनेत्री रुबिना दिलैक होणार जुळ्या बाळांची आई

नवी दिल्ली प्रतिनिधी – संसदेच्या नव्या इमारतीत कर्मचाऱ्यांना नवा गणवेश मिळणार आहे. महत्त्वाचे असे की, ‘इंडियन टच’ असलेल्या, नवीन गणवेशात ‘नेहरू जॅकेट’ आणि खाकी रंगाची पँट असेल. नवीन ड्रेस कोड संसदेच्या दोन्ही सभागृहात लागू होणार आहे. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी ने हा गणवेश तयार केला आहे संसद कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारने बोलावलेल्या येत्या विशेष अधिवेशनापासून नवीन गणवेश मिळणार आहे. जो सध्या देशभर टीकेचा विषय ठरला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार येत्या 18 सप्टेंबरपासून संसदेचे कामकाज नव्या इमारतीमधून होणार आहे. त्यामुळे नव्या इमारतीत कर्मचाऱ्यांना नवा गणवेश मिळणार आहे. महत्त्वाचे असे की, ‘इंडियन टच’ असलेल्या, नवीन गणवेशात ‘नेहरू जॅकेट’ आणि खाकी रंगाची पँट असेल. नवीन ड्रेस कोड संसदेच्या दोन्ही सभागृहात लागू होणार आहे. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी ने हा गणवेश तयार केला आहे. दिलेल्या वृत्तानुसार संसदेतील नोकरशाहा, अधिकारी यांच्या गळाबंद सूटला नेहरु जॅकेटने बदलले जाईल. त्यांचे शर्टसुद्धा कमळाच्या फुलांची नक्षी असलेले असेल. तर सर्वसाधारण कर्मचारी खाकी रंगाची पँट घातलील.

COMMENTS