Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

संगमनेरात थॅलेसेमिया डे केअर सेंटरचे उद्घाटन

संगमनेर/प्रतिनिधी ः अर्पण रक्तपेढीच्या वतीने थॅलेसेमिया डे केअर सेंटरचा उद्घाटन सोहळा सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, माजी महसूल मंत्री बाळासाहेब

कर्जत ’महसूल’चा भोंगळ कारभार ?
अहमदनगरच्या नरेंद्र कुदळेची राष्ट्रीय पातळीवर निवड
संपावरील शिक्षकांनी भरलेल्या चार शाळा दिल्या चक्क सोडून…

संगमनेर/प्रतिनिधी ः अर्पण रक्तपेढीच्या वतीने थॅलेसेमिया डे केअर सेंटरचा उद्घाटन सोहळा सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, आमदार सत्यजित तांबे, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे , उद्योजक राजेश मालपाणी, गिरीष मालपाणी यांसह मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आला. संगमनेर नगरपालिकेच्या आवारातील कॉटेज हॉस्पिटलसमोरील केनेडी हॉलमध्ये हे सेंटर सुरू करण्यात आल आहे.
थॅलेसेमिया हा आजार जास्त करून लहान मुलांमध्ये दिसून येतो, त्यावर आता संगमनेर मध्ये मोफत उपचार होणार आहे. या रुग्णांना रक्तही फ्री मिळेल, आणि ज्या रुग्णांना दर पंधरा दिवसांनी रक्त भरावा लागते त्यांना मोफत रक्त भरून देण्याची सोय अर्पण रक्त पेढीने केली असल्याची माहिती  डॉ. वर्षा उगावकर यांनी दिली आहे. यावेळी एका नाटिकेच्या माध्यमातून उपस्थित मान्यवरांना या आजाराविषयी जनजागृती करण्यात आली. अर्पण रक्तपेढीच्या वैद्यकीय संचालक डॉ. मधुरा पाठक यांनीही या आजाराविषयी उपस्थितांना मार्गदर्शन केले. अर्पण रक्तपेढी रक्त संकलनासाठी संगमनेर शहरातील आणि तालु्यातील ज्या व्यक्तींनी आणि संस्थांनी मदत  केली, अशा मान्यवरांचा यावेळी प्रशस्तीपत्रक आणि ट्रॉफी येऊन सत्कार करण्यात आला. अर्पण रक्तपेढी ही सर्वसामान्य माणसाच्या जीवनात आनंद निर्माण करण्याचे काम करीत असल्याचे गौरव उद्गार राज्याचे माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी काढले. अर्पण रक्तपेढी च्या माध्यमातून या आजारावर मोफत उपचार करत आहे, हे खरोखर कौतुकास्पद असून आगामी काळात महात्मा फुले योजनेत या आजराचा समावेश करण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे आग्रह धरू, अशी ग्वाही सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली.  यावेळी या कार्यक्रमात संगमनेर शहर आणि तालुक्यातील रक्तदाते,  रक्तदान शिबीर आयोजित करणार्‍या विविध संस्थांचे पदाधिकारी नागरिक  यांची मोठी उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पाटील यांनी केले.

COMMENTS