शाहरुख खानच्या 'जवान' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. ७ सप्टेंबरला प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने पहिल्याच दिवशी कोट्यावधी रुपयांचा

शाहरुख खानच्या ‘जवान’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. ७ सप्टेंबरला प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने पहिल्याच दिवशी कोट्यावधी रुपयांचा गल्ला जमवला. ‘पठाण नंतर आता संपूर्ण देशभरात ‘जवान’ चित्रपटाचा बोलबाला होत आहे. तरुणांना ‘जवान’ चित्रपटाची भूरळ पडली असून चित्रपटगृहात शिट्ट्यांचा सूर लावला जात आहे. अशातच एका चित्रपट गृहातील व्हायरल झालेल्या व्हिडीओनं सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. जवान चित्रपटातील ‘चलेया’ गाण्यातील रोमॅन्टिक सीन सुरु होताच एका तरुणाने प्रेयसीला थेट प्रपोज केला. प्रेक्षकांनी खचाखच भरलेल्या चित्रपटगृहात सर्वांसमोर तरुणाने त्या मुलील प्रपोज केल्याने टाळ्यांचा आणि शिट्ट्यांचा गजर वाजला. हा रोमॅन्टिक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला नेटकऱ्यांनी मजेशीर प्रतिक्रियांचा वर्षाव केला आहे. शाहरुख खान युनिव्हर्स फॅन क्लब नावाच्या ट्वीटर हँडलवर तरुणांचा हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ शेअर करत कॅप्शनमध्ये म्हटलंय, जवान चित्रपटातील ‘चलेया’ गाणं सुरु होताच लाईव्ह प्रपोज करण्यात आलं. तरुणाने प्रेयसीला प्रपोज केल्याचा हा हृदयस्पर्शी व्हिडीओ कॅमेरात कैद झाला आहे. या व्हिडीओला प्रतिक्रिया देत एका नेटकऱ्याने म्हटलं, खूपच छान. तसंच अन्य एक नेटकरी म्हणाला, तो मुलगा खरच खूप छान आहे. शाहरुख खानचा जवान चित्रपट प्रचंड गाजला असून पहिल्याच दिवशी या चित्रपटाने १०० कोटींच्या कमाईचा टप्पा पार केला होता. दुसऱ्या दिवशीही या चित्रपटाने कोट्यावधी रुपयांचा गल्ला जमवला. त्यामुले जवानने दुसऱ्या दिवशी २४० कोटींहून जास्त रुपयांची कमाई केल्याची माहिती समोर आली होती. शाहरुख खानसोबत, नयनतारा आणि विजय सेतुपती यांनी या चित्रपटात मुख्य भूमिका साकारल्या आहेत. तसंच प्रियामणी, सान्या मल्होत्रा, रिद्धी डोग्रा, आलिया, गिरीजा ओक यांनीही महत्वाची भूमिका बजावल्या आहेत. विशेष म्हणजे जवान चित्रपटात दीपिका पदूकोणचा छोटासा कॅमिओ तमाम प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत आहे.
COMMENTS