Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

गरोदर महिलेला रुग्णालयात दाखल करण्यास डॉक्टरांचा नकार; प्रवेशद्वारावर दिला बाळाला जन्म

कल्याण प्रतिनिधी - कल्याण स्कायवॉकवर एका गरोदर महिलेला प्रसूतीच्या वेदना सुरु झाल्या. त्याची माहिती नागरीकांनी पोलिसांना दिली. पोलिसांनी हमा

 संजय राऊत यांचं राजकारण डबल ढोलकी प्रमाणे
गौतमीचे आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल करणारा पोलिसांच्या ताब्यात
अमरावतीमध्ये बच्चू कडू यांचे शक्तीप्रदर्शन

कल्याण प्रतिनिधी – कल्याण स्कायवॉकवर एका गरोदर महिलेला प्रसूतीच्या वेदना सुरु झाल्या. त्याची माहिती नागरीकांनी पोलिसांना दिली. पोलिसांनी हमालाच्या मदतीने तातडीने त्या महिलेला हातगाडीवर टाकून महापालिकेच्या रुक्मीणीबाई रुग्णालयात आणले. मात्र रुग्णालयाने रुग्णालयात स्टाफ नसल्याचे कारण देत तिची प्रसूती करुन घेण्यास नकार दिला. पोलिस आणि हमालांनी विनंती करुन देखील रुग्णालयाने महिलेला रुग्णालयात दाखल करुन घेतले नाही. अखेरी त्या महिलेची प्रसूती रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावरच झाली आहे. प्रूसत झालेल्या महिलेचे नाव राबिया साधू सिद असे आहे. तिला मुलगी झाली आहे. या घटनेवरुन रुग्णालयाचा भोंगळ कारभार उघड झाला आहे. कोट्यावधी रुपये रुग्णालयावर खर्च केल जातात. त्याठिकाणी एका महिलेची प्रसूती करण्यास स्टाफ साधी तत्परता दाखवू शकत नाही ही अत्यंत लाजीरवाणी गोष्ट आहे. हेच या घटनेतून स्पष्ट होत आहे. राबिया सीद ही महिला गराेदर होती. तिला स्टेशन परिसरातील स्कायवॉकवर प्रसूतीच्या वेदना सुरु होताच हा प्रकार नागरीकांनी पाहिला. तिची अवस्था पाहून नागरीकांनी पोलिसांना कळविले. पोलिसांनी तातडीने स्कायवॉक गाठला. तिची अवघडलेली अवस्था पासून तातडीने तिला हातगाडीवर ठेवले. हातगाडीवरुन हमाल दिलावर शेख यांच्या मदतीने रुक्मीणीबाई रुग्णालयात आणले. त्याठिकाणी रुग्णालयातील उपस्थितीत स्टाफने त्यांच्याकडे प्रसूतीसाठी स्टाफ नसल्याचे सांगून महिलेली प्रसूती करण्यास नकार दिला. त्यावेळी पोलिस विकास ठाकरे यांनी रुग्णालयाकडे विनंती केली. अहो महिलेच्या पोटातील बाळ हे अर्धे बाहेर आले आहे. तिची प्रसूती झाली नाही तर तिच्यासह तिच्या बाळाचा मृत्यू होईल. या विनंती पश्चातही रुग्णालय बधले नाही. या महिलेला प्रसूतीसाठी महापालिकेच्या वसंत व्हॅली येथील प्रसूती गृहात घेऊन जा असे सांगितले. अखेरीस त्या महिलेची प्रसूती रुग्णालयाच्या प्रवेशद्वाराजवळ झाली. पोलिसांनी आणि हमालांनी रुग्णालय प्रशासनाच्या या कारभाराविरोधात तीव्र संताप व्यक्त केला आहे. रुग्णालयातील स्टाफने साधी माणूसकी दाखविली नाही. महिलेची प्रसूती झाली असून तिला मुलगी झाली आहे. प्रसूतीनंतर रुग्णालयाने तिला तिच्या नवजात मुलीसह एका लहान रुग्णवाहिकेतून वसंत व्हॅली प्रसूतीगृहात पाठविण्यात आले.

COMMENTS