Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अहमदनगर शहरात उद्या मंगळागौर उत्सवाचे आयोजन  

भरतनाट्यम डान्स स्टुडिओचा पुढाकार

अहमदनगर/प्रतिनिधी ः श्रावण महिन्यात मंगळागौरीचे आगमन होते. यानिमित्त विविध खेळ खेळले जातात, त्यासाठी शहरातील मंडळांची जय्यत तयारी सुरू असते. अहमद

नगरमधील सात पक्की अतिक्रमणे जमीनदोस्त
भाजपा आमदार राम सातपूते यांच्या समर्थनार्थ श्रीरामपुरात भव्य रँली
शहापूर सोसायटी चेअरमनपदी घारे तर व्हा. चेअरमनपदी डांगे

अहमदनगर/प्रतिनिधी ः श्रावण महिन्यात मंगळागौरीचे आगमन होते. यानिमित्त विविध खेळ खेळले जातात, त्यासाठी शहरातील मंडळांची जय्यत तयारी सुरू असते. अहमदनगर शहरात देखील उद्या मंगळवारी 12 सप्टेंबर रोजी मंगळागौर महिला उत्सवाचे आयोजन आम्रपाली मंगल कार्यालय, गुलमोहोर रोड, अहमदनगरमध्ये करण्यात आल्याची माहिती भरतनाट्यम डान्स स्टुडिओच्या प्रमुख मानसी यांनी दिली आहे.
या कार्यक्रमासाठी अंजली नृत्यालयाच्या संचालिका सुरेखा डावरे, रसिक गु्रपचे अध्यक्ष जयंत येलूलकर, आंतरराष्ट्रीय शास्त्रीय व सुफी गायक पवन श्रीकांत नाईक, लेखक, कवी दिग्दर्शक चंद्रकांत जोशी, शिवशाही पुनर्वसन प्रकल्पाचे व्यवस्थापकीय संचालक आयएएस गुलाबराव खरात, निवेदक विनय कसबेकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. या मंगळागौर कार्यक्रमात प्रशिक्षित 70 शिबिरार्थी महिला आपल्या कलेचा आविष्कार करणार आहेत. मंगळागौर म्हटलं की, महिलांचा उत्सव अवर्णनीय असतो. मंगळागौरीमध्ये आता कालानुरूप बदल होत असले तरी यातून परंपरा जपण्याचे काम महिला या उत्सवातून करत असतात. शिवाय या खेळातून कल्पनाशक्ती वाढण्यात मोठी मदत होते. मंगळागौरमुळे संस्कृतीचे जतन केले जाते. खेळामुळे आरोग्य चांगले राहते. पुढच्या पिढीला संस्कृती काय आहे ते समजावे यासाठी मंगळागौरच्या खेळाचे आयोजन केले जाते. खेळामुळे लठ्ठपणा, पोट सुटणे, कंबरदुखी, पाठदुखी असे विविध आजार मोठया प्रमाणावर वाढत आहेत. दररोज फिरायला जाणे, जीममध्ये जाणे अनेक महिलांना शक्य नसते, परंतु या पारंपरिक खेळांतून एकप्रकारे व्यायाम देखील होत असतो, त्यामुळे मंगळागौरमध्ये  सहभाग घेण्याचे प्रमाण वाढत आहे, त्यामुळेच भरतनाट्यम डान्स स्टुडिओने आयोजित केलेल्या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन कार्यक्रमाचे आयोजन विक्रम देशमुख, सीमा देशमुख,आणि मंगळागौरी टीम आणि भरतनाट्यम डान्स स्टुडिओच्या मानसी यांनी केले आहे.

महिलांना मिळाले हक्काचे व्यासपीठ – खरंतर मंगळागौरचा कार्यक्रम म्हटला की, पारंपारिक नृत्य आणि खेळ आलाच. मात्र यासाठी प्रत्येक महिलांना आपले हक्कांचे व्यासपीठ मिळतेच असे नाही. मात्र भरतनाट्यम डान्स स्टुडिओ यांनी अहमदनगर शहरातील महिलांना एक हक्कांचे व्यासपीठ मिळवून देऊन,आपले पांरपारिक नृत्य आणि खेळ सादर करण्याची संधी दिली आहे.  

COMMENTS